शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ नरभक्षक वाघाला ठार मारण्याचे आदेश

By admin | Updated: February 1, 2017 00:29 IST

ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागूनच असलेल्या शिवणी व सिंदेवाही वनपरिक्षेत्रात येत असलेल्या ..

वनविभाग लागला कामाला : शिवणी व सिंदेवाही परिसर दहशतीतमोहाळी (नलेश्वर) : ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागूनच असलेल्या शिवणी व सिंदेवाही वनपरिक्षेत्रात येत असलेल्या शेतशिवारात व गावात सातत्याने एक महिन्यापासून धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याच्या दृष्टीकोनातून वनविभागाचे प्रधान सचिव भगवान यांनी त्या वाघाला ट्रॅक्युलायझिंग इंजेक्शन शुट करुन बेशुद्ध करणे व कैद करणे ते शक्य होत नसेल तर शुट करून ठार मारण्याचे आदेश दिलेले आहेत.ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागूनच असलेल्या शिवणी व सिंदेवाही वनपरिक्षेत्रात एका नरभक्षक वाघाने महिन्याभरापासून सिंदेवाही तालुक्यातील अनेक गावखेड्यात व शेतशिवारात धुमाकूळ घालून चकबाम्हणी, शिवणी व मोहाळी येथील तीन महिलांना जागीच ठार मारले तर वाकल व वानेरी येथील दोन महिलांना गंभीररित्या जखमी केले. या घटनेने संपूर्ण सिंदेवाही तालुक्यात नरभक्षक वाघाची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.तो नरभक्षक वाघ शेतशिवारातच नव्हे तर गावातही प्रवेश करु लागल्याने रात्रीच्या सुमारास गावागावातील नागरिक भीतीपोटी घराच्या बाहेर पडत नसल्याचे चित्र आहे. त्या नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी मागील सहा- सात दिवसांपासून १५० च्या जवळपास वनकर्मचारी व अधिकरी २० ते २५ गाड्यांच्या ताफ्यासह रात्रंदिवस गस्त घालत आहेत. या कामी पोलीस विभागाचीही मदत घेण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर त्या वाघाला कैद करण्यासाठी सिंदेवाही व शिवणी वनपरिक्षेत्रातील काही गावात पिंजरे व पिंजऱ्यात बकऱ्या, कुत्रे व रेडाही ठेवण्यात आला. ठिकठिकाणी ट्रप कॅमेरे लावून शॉर्प शुटर तैनात ठेवले आहे. एवढे करूनही वाघ सापडलेला नाही.त्यामुळे त्या नरभक्षक वाघाचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याच्या दृष्टीकोनातून ३० जानेवारीला दुपारी १ वाजता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक गरड यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण या समितीची बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीला उपसंचालक गजेंद्र नरवणे व सर्व विभागाचे वनसंरक्षक, ताडोबाचे वाघ तज्ज्ञ, एन.जी.ओ., ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी, मोहाळी येथील सरपंच सुनिता दोडके उपस्थित होते. दरम्यान, घटनेचे गांभीर्य व गावातील नागरिकाचा उद्रेक पाहता शक्यतोवर वाघाला बेशुद्ध करणे व कैद करणे तसेच न झाल्यास शुट करुन ठार मारण्याचे आदेश प्रधान सचिव भगवान यांच्याकडून मागविण्यात आले. भगवान यांनी त्या वाघाला बेशुद्ध करुन कैद करणे शक्य न झाल्यास शुट करुन ठार मारण्याचे आदेश दिल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. (वार्ताहर)