शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

पीएफ लेखेसंदर्भात चौकशी करण्याचे आदेश

By admin | Updated: September 24, 2014 23:28 IST

जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांना भविष्य निर्वाह निधीचे लेखे सन २०११ पासून न मिळाल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चुनारकर यांनी ग्राामविकास

चंद्रपूर : जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांना भविष्य निर्वाह निधीचे लेखे सन २०११ पासून न मिळाल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चुनारकर यांनी ग्राामविकास व पंचायत राज्य विभागाकडे केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्याचे पत्र ग्रामविकास व पंचायत विभागाने जिल्हा परिषदेला पाठविले आहे. जिल्हा परिषद चंद्रपूर येथील प्राथमिक शिक्षक भविष्य निर्वाहर निधी वर्गणीदार आहेत. भविष्य निर्वाह निधी कार्यपद्धतीच्या नियमानुसार लेखा अधिकाऱ्याने प्रत्येक आर्थिक वर्ष संपल्यानंतर शक्य होईल तितक्या लवकर प्रत्येक वर्गणीदाराला निधीतील त्याच्या हिशोबासंबंधीचे विवरणपत्र पाठविले पाहिजे आणि अशा विवरणपत्रात १ एप्रिल रोजी असललेली प्रारंभिक शिल्लक वर्षात जमा किंवा खर्च झालेली रक्कम वर्षाच्या ३१ मार्च रोजी जमा झालेल्या व्याजाची रक्कम आणि त्या तारखेला अखरेची शिल्लक असलेली रक्कम दर्शविली पाहिजे, असा महाराष्ट्र जिल्हा परिषद सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम आहे. परंतु या नियमांकडे दुर्लक्ष करुन चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाने सन २०११-१२, सन २०१२-१३ व सन २०१३-१४ या तब्बल तीन वर्षांचे भविष्य निर्वाह निधी लेखे वर्गणीदारास उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांत प्रचंड असंतोष पसरला होता. संबंधित प्रकरणासंबंधाधत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षकांत प्रचंड असंतोष पसरला होता.या प्रकरणासंदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चुनारकर यांनी महाराष्ट्र शासनाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची महाराष्ट्र शासनाने तातडीने दखल घेतली. असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रातून दिले आहेत.महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियमातील तरतुदीनुसार वर्ग तीन व वर्ग चारच्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांबाबातच्या सेवाविषयक बाबीवर निर्णय घेण्यास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी आहेत. त्यामुळे प्रस्तूत तक्रार अर्जाची सखोल चौकशी करुन नियमानुसार भविष्य निर्वाह निधी लेखे देण्याची कार्यवाही करावी, असे म्हटले आहे. (नगर प्रतिनिधी)