शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मोखाळा येथील नवीन दारू दुकानाला महिलांचा विरोध

By admin | Updated: August 9, 2014 01:38 IST

दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या सावली तालुक्यातील मोखाळा हद्दीत परवानाधारक नविन दारू दुकान उघडण्यास महिलांनी विरोध केला असून ...

उपरी : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या सावली तालुक्यातील मोखाळा हद्दीत परवानाधारक नविन दारू दुकान उघडण्यास महिलांनी विरोध केला असून या ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुरू असलेले बिअर बारसुध्दा बंद करावे अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना मोखाळा येथील महिलांनी दिले आहे.सदर निवेदनातील माहितीनुसार मोखाळा हे गाव चंद्रपूर - गडचिरोली महामार्गावर असून दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यालगत आहे. अशी स्थिती असतानासुद्धा शासनाच्या अनागोंदी कारभारामुळे या परिसरात दारूची दुकाने व बिअरबार उघडली आहेत. या पार्श्वभूमीवर मोखाळा हद्दीत बिअरबारची परवानगी दिली. मात्र १३ मे २०१३ ला याच हद्दीत परवानाधारक देशी दारू विक्रीचे दुकान लावण्यासाठी परवानाधारकांनी ग्रामपंचायतकडे अर्ज केला होता. त्यावेळी आयोजित ग्रामसभेत महिलांनी एकमताने कोणत्याही दारू दुकानास परवानगी देण्यात येवू नये असा ठराव पारीत केला आणि तो ठराव जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना देण्यात आला. त्यानंतर तो ठराव रद्द करण्यात आला नाही. मात्र २३ जून २०१४ रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत सदर ठराव चुकीच्या मार्गाचे मंजुर करण्यात आला आहे. ज्या विषयावर ही ग्रामसभा घेण्यात आली त्याचे नोटीस गावात सात दिवसापूर्वी लावायला पाहिजे होती. परंतु नोटीस एक दिवस आधी लावण्यात आल्या. गावातील महिला कामानिमित्याने शेतावर निघून गेल्या. ज्या महिला ग्रामसभेला उपस्थित होत्या, त्यांना पुर्वकल्पना दिल्याने ग्रामसभेला उपस्थित राहिल्याचा आरोप केला आहे. एकंदरीत ही ग्रामसभाच चुकीची असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मोखाळा येथील सामाजिक कार्यकर्त्या व महिलांनी या संदर्भात जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना लेखी निवेदन सादर केले आहे.मोखाळा हद्दीत नविन होणारे देशी दारू दुकान हे व्याहाड (बुज.)च्या बस थांब्याजवळ असलेल्या अशोक बिअरबारजवळ होणार असल्याची चर्चा आहे. असे झाल्यास या थांब्यावर असणाऱ्या शाळकरी मुली, महिलांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे येथे असलेले बिअरबारसुद्धा बंद करावे. जे बार याठिकाणी आहे, त्यांच्या जवळ दारूचे दुकान कशासाठी असा सवालही महिलांनी केला आहे.