शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील रस्ते डागडुजीसाठी मनपासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 22:51 IST

अमृत पाणी पुरवठा योजनेसाठी शहरातील अंतर्गत रस्ते खोदण्यात आले. परंतु, या रस्त्यांची डागडुजी न केल्याने बुधवारी मनपासमोर निदर्शने करण्यात आले. आठ दिवसाच्या रस्त्यांची डागडुजी केली नाही तर कंत्राटदरांच्या जेसीबी मशिन फोडण्याचा इशारा किशोर जोरगेवार यांनी दिला आहे.

ठळक मुद्देशेकडो नागरिक सहभागी : अन्यथा जेसीबी फोडण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: अमृत पाणी पुरवठा योजनेसाठी शहरातील अंतर्गत रस्ते खोदण्यात आले. परंतु, या रस्त्यांची डागडुजी न केल्याने बुधवारी मनपासमोर निदर्शने करण्यात आले. आठ दिवसाच्या रस्त्यांची डागडुजी केली नाही तर कंत्राटदरांच्या जेसीबी मशिन फोडण्याचा इशारा किशोर जोरगेवार यांनी दिला आहे.शहरात अमृत कलश योजनेचे काम सुरू आहे. त्यासाठी २३५ कोटी रूपये खर्च केल्या जाणार आहे. इतक्या मोठ्या कामाचे कंत्राट अनुभव नसलेल्या कंत्राटदाराला देण्यात आले आहे. कंत्राटदाराविरूद्ध अनेक तक्रारी असून कारवाईकरण्यात आलेली नाही. उलट पाठराखण करण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांना केला. ठेकेदाराला बांधकामाचा अनुभव नसल्याने अमृत कलश योजनेमुळे शहरातील रस्त्यांचे विद्रुपीकरण झाले. या रस्त्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या खोदकामामुळे सौंदर्यीकरणावर पाणी फेरले. खोदलेल्या रस्त्यांची डागडुजी केल्यानंतरच पूढील खोदकाम आठ दिवसांत पूर्ण करा अन्यथा कंत्राटदाराच्या जेसीबी फोडून काम बंद पाडू, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी नगरसेवक विशाल निंबाळकर, विशाल मत्ते, इरफान शेख, विनोद अनंतवार, कलाकार मल्लारप, टिकाराम गावंडे, वंदना हातगावकर, संतोषी चव्हाण, दुर्गा वैरागडे, माला पेंदाम, माला तुरारे, रजनी चिंचोळकर, सुजाता बल्ली, शांता धांडे, मुन्ना जोगी, हर्षद कानमपल्लीवार, कालिदास धामनगे, कैलास धायगुडे, राशीद हुसैन, सुरज चव्हाण उपस्थित होते.रस्त्यांची दुरूस्ती तातडीने पूर्ण करणारपाईपलाईन टाकताना कोणतेही नियोजन केले नाही. संबंधित कंत्राटदाराला मोठ्या योजना पूर्ण करण्याचा अनुभव नाही. याचे परिणाम शहरातील नागरिक भोगत आहेत. शहरातील सर्वच रस्ते खराब झाले. नागरिकांना वाहनातून स्वतच्या घरापर्यंत जाणे कठीण झाले. अनेक अपघात होत आहेत, अशी नाराजी मनपा आयुक्त संजय काकडे यांना दिलेल्या निवेदनातून व्यक्त केली. रस्त्यांची कामे तत्काळ पूर्ण करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.