शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलितील डम्पर आॅपरेटरच्या बदलीला इंटक युनियनचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 23:01 IST

वेकोलि माजरी क्षेत्रातील १० डम्पर आॅपरेटरांची वणी नॉर्थ क्षेत्रात बदली करण्यात आली आहे. या बदलीचा इंटक युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. या बदल्या रद्द न झाल्यास आंदोलन उभारू, अशा आशयाचे निवेदन वेकोलि प्रबंधकाला दिल्याचे आयोजित पत्रपरिषदेत माजरी वेकोलि इंटकचे अध्यक्ष धनंजय गुंडावार यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : वेकोलि माजरी क्षेत्रातील १० डम्पर आॅपरेटरांची वणी नॉर्थ क्षेत्रात बदली करण्यात आली आहे. या बदलीचा इंटक युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. या बदल्या रद्द न झाल्यास आंदोलन उभारू, अशा आशयाचे निवेदन वेकोलि प्रबंधकाला दिल्याचे आयोजित पत्रपरिषदेत माजरी वेकोलि इंटकचे अध्यक्ष धनंजय गुंडावार यांनी सांगितले.यापूर्वी या क्षेत्रातील इतरत्र केल्या गेलल्या कामगारांच्या बदलीविरोधात खाणीतील कार्यरत पाचही कामगार संघटनांनी वेकोलि महाप्रबंधकास पत्र देवून स्थानांतर करू नये, अशी मागणी केली होती. यावर माजरी क्षेत्राच्या क्षेत्रीय महाप्रबंधकांनी १३ मे २०१८ ला इंटक युनियटच्या अध्यक्षाला पत्र देवून या क्षेत्रातीलच अन्य कोळसा खाणीत त्यांचे स्थानांतर करू, असे लिखीत दिले.परंतु त्यांनी आपल्या दिलेल्या पत्रास केराची टोपली दाखवून माजरी क्षेत्रातील १० डम्पर आॅपरेटरांची वणी नॉर्थ येथे १९ आॅक्टोंबरला बदली केली आणि या सर्वांना २० आॅक्टोंबरला भारमुक्त केले. यापूर्वी युनियनच्या पदाधिकाºयांनी ७ आॅक्टोंबरला महाप्रबंधकासोबत स्थानिक कामगारांच्या स्थानांतर न करण्याबाबत चर्चा केली असता आपणावर जी. एम. आय. नागपूर यांचा दबाव असल्याचे सांगितले. बदली झालेल्या १० आॅपरेटरांचे सहा महिन्यांपूर्वी दुसºया कोळसा खाणीतून येथे स्थानांतर झाले होते, हे विशेष.या संदर्भात दहाही कामगारांनी आपल्या न्यायीक मागणीसाठी २१ आॅक्टोबरला महाप्रबंधकास पत्र देवून आत्मदहन आणि आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. वेकोलिच्या नागपूर विभागात १० वेकोलिचे क्षेत्र आहे. प्रत्येक ठिकाणी ७०० ते १००० पर्यंत अतिरिक्त कामगार कार्यरत आहेत. या ठिकाणी ६३ कामगार अतिरिक्त असतांनासुद्धा येथीलच कामगारांचे स्थानांतर का केले जाते, असा प्रश्न इंटक नेते धनंजय गुंडावार यांनी यावेळी केला.इंटकचे जनरल सेक्रेटरी एस. क्यू. जमा यांनी नागपूर येथील सीएमडी यांना १३ आॅक्टोबरला पत्र देवून बदली रद्द करण्याचे सांगितले. तसेच २६ आॅक्टोबरला नागपूर - वर्धा रिझन कमिटी इंटकचे महामंत्री के. के. सिंग यांनी माजरी येथे येवून अधिकाºयांशी चर्चा केली.जोपर्यंत या १० कामगारांचे स्थानांतर रद्द करून त्यांना याच ठिकाणी कार्यरत करीत नाहीश तोपर्यंत इंटक युनियन शांत बसणार नाही, असा इशारा इंटक अध्यक्ष धनंजय गुंडावार यांनी दिला. यावेळी माजरी क्षेत्राचे कार्याध्यक्ष संजय दुबे, कामगार राजू बोबडे, दत्तू सैताने, सुधाकर बेलखडे यांच्यासह कामगार उपस्थित होते.