शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विरोधक, समर्थक आमने-सामने

By admin | Updated: June 3, 2016 00:51 IST

नागभीड नगरपरिषद विरोधक आणि समर्थक एकमेकांसमोर आल्याने येथे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली.

नागभीड नगरपरिषदेतील प्रकार : काही काळ तणावाचे वातावरणनागभीड : नागभीड नगरपरिषद विरोधक आणि समर्थक एकमेकांसमोर आल्याने येथे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली. शेवटी प्रशासनाने समजूत घालून निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढला.११ एप्रिल रोजी नागभीड नगरपरिषदेची स्थापना करण्यात आली. या नगर परिषदेत आजूबाजूची आणखी नऊ गावे समाविष्ट करण्यात आली. यात बोथली, बाम्हणी, चिखलपरसोडी, तुकूम, भिकेश्वर, सुलेझरी, डोंगरगाव आदी गावांचा समावेश आहे. यातील सुलेझरी, चिखलपरसोडी ही गावे वगळता अन्य गावांचा नगर परिषदेत सहभागी होण्यास विरोध आहे. विरोध असणाऱ्या गावांनी गुरुवारी येथील आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्या कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते.सदर मोर्चा येथील प्रमुख मार्गाने येत असताना दुसऱ्या बाजूने नगर परिषद समर्थकही आपला मोर्चा घेऊन आले. हे दोन्ही मोर्चे येथील सिमेना टॉकीज चौकात आमने सामने आले. दोन्ही मोर्चे समोरासमोर आल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. तहसीलदार समीर माने, ठाणेदार बी. डी.मडावी, तळोधीचे ठाणेदार व्ही. एस. सोनवणे हे मोर्चेकऱ्यांची समजूत घालीत होते. पण कोणीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. जवळपास एक तास ही गोंधळाची स्थिती होती.शेवटी नगर परिषद समर्थकांची समजूत काढण्यात प्रशासनाला यश आले आणि नगर परिषद विरोधकांचा मोर्चा समोर निघाला. यानंतर पोलीस ठाण्यासमोर या मोर्चालाही अडविण्यात आले. या ठिकाणी मोर्चा अडविण्यात आल्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. मोर्चाचे नेतृत्व अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, प्रफुल्ल खापर्डे, दिनेश गावंडे, अमृत शेंडे, पुरुषोत्तम बगमारे, नानाजी माटे समदूर गेडाम यांनी केले.तर नगरपरिषद समर्थकांच्या मोर्चाचे नेतृत्व वसंत वारजूकर, अवेश पठाण, गणेश तर्वेकर, सचिन आकुलवार, संजय गजपुरे, नासीर शेख, विनय शेंडे, प्रदीप तर्वेकर यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)