शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

दोन कंपनीसह एका संचालकावर गुन्हा दाखल

By admin | Updated: May 19, 2016 00:40 IST

वर्धा नदीच्या पात्रात मार्डा घाटात उत्खनन करून खड्डे केले. त्या खड्ड्यातील पाण्यात बुडून एका शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता.

न्यायालयाचे आदेश : विद्यार्थ्याचे मृत्यू प्रकरणवरोरा : वर्धा नदीच्या पात्रात मार्डा घाटात उत्खनन करून खड्डे केले. त्या खड्ड्यातील पाण्यात बुडून एका शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जबाबदार असलेल्यावर गुन्हे दाखल करून तपास करण्याच्या मागणीकरिता न्यायालयात अर्ज सादर करण्यात आला. न्यायालयाने वरोरा तालुक्यातील दोन कंपनी व एका कंपनी संचालकाविरूद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. या आदेशावरून वरोरा पोलिसांनी गुन्हे दाखल करून तपास कामाला प्रारंभ केला आहे.वरोरा तालुक्यात अनेक कंपन्या आल्या असून त्यांनी उत्पादन सुरू केले आहे. कंपन्यांना काही कामाकरिता गौण खनिजाची आवश्यकता असल्याने अनेक ठिकाणी विना परवानगीने गौण खनिजाचे उत्खनन केले जाते. याप्रकरणी अनेकदा महसूल विभागाने अवैध खोदकाम करणाऱ्या कंपन्याकडून दंडही वसूल केला आहे. यासोबतच वर्धा नदीवरील मार्डा घाटात बंधाऱ्याचे काम सुरू आहे. या बंधाऱ्यामधून औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या कंपन्यांना पाणी देणार आहे. या बंधाऱ्याच्या कामाकरिता वर्धा नदीत खोदकाम केले आहे. या खड्डयात पाणी आहे. या खड्डयात बुडून श्रेयश खोब्रागडे या दहावीतील विद्यार्थ्यांचा काही दिवसापूर्वी बुडून मृत्यू झाला होता. या खड्डानजीक सुरक्षा रक्षक व सूचना फलक लावण्यात आले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात यावे, याकरीता विनोद खोब्रागडे यांनी वरोरा न्यायालयात अर्ज १२ गैरअर्जदाराविरूद्ध दाखल केला होता. या प्रकरणी न्यायालयाने सदर अर्ज अशंत: मंजूर करीत साई वर्धा पॉवर, डीएनआर इम्फ्रा इंजिनियरिंग कन्स्ट्रक्शन कंपनी तसेच दिनेश नाईक व्यवस्थापक डीआरएन इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर कंपनी मोजा विरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. (तालुका प्रतिनिधी)