शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरातील खुल्या जागांचा विकास रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 23:02 IST

शहरातील ६६ प्रभागांमध्ये अनेक ठिकाणी मोकळ्या जागेवर नागरिकांनी अतिक्रमण केले. खुल्या जागांचा विकास करण्यासाठी मनपाने विकास आराखड्यात १ कोटीची तरतुद केली होती. १३ मार्च २०१८ ला स्थायी समितीच्या अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेने या आराखड्याला मंजुरी दिली.

ठळक मुद्देअतिक्रमणाचा विळखा : विकास आराखडा कागदावरच

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील ६६ प्रभागांमध्ये अनेक ठिकाणी मोकळ्या जागेवर नागरिकांनी अतिक्रमण केले. खुल्या जागांचा विकास करण्यासाठी मनपाने विकास आराखड्यात १ कोटीची तरतुद केली होती. १३ मार्च २०१८ ला स्थायी समितीच्या अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेने या आराखड्याला मंजुरी दिली. मात्र अतिक्रमण जैसे-थे असल्याने विकासासाठी केलेली तरतुद कागदावरच राहिल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा मिळाव्या, यासाठी अनेक योजना तयार करण्यात आल्या. विविध विकासकामे करण्यासाठी मनपाला आर्थिक स्थिती बळकट करणे गरजेचे आहे. याच हेतुने पाच वर्षांकरिता विविध योजनांचा आराखडा तयार करण्यात आला. शहरातील वाढीव चटईक्षेत्र निर्देशांकानुसार बांधकाम करण्यासाठी शेकडो नागरिकांनी अर्ज केले. या बांधकामामुळे महानगरपालिकेला बऱ्यापैकी शुल्क मिळाले. गुंठेवारी जमिनीची प्रकरणे सध्या प्रलंबित असल्याने मनपाला फारसा आर्थिक लाभ झाला नाही. २०१८ -१९ या वर्षामध्ये या कामातून २ कोटी रूपये उत्पन्न मिळविण्याची अपेक्षा मनपाला होती. परंतु, गुंठेवारी प्रकरणे फाईलबंद करण्यात आले. शहरातील विविध वार्र्डांमध्ये नागरिकांनी अतिक्रमण केले होते. हे अतिक्रमण काढण्यासाठी मनपाने ठोस पाउले उचलले नाही. बगिचा निर्माण करण्याकरिता तसेच अस्तित्वात असलेल्या बगिचांचा विकास करण्यासाठी दीड कोटी रूपयांची तरतुद अर्थसंकल्पात करण्यात आली. मात्र, शहरातील अनेक बगिचांच्या जागेवर नागरिकांनी अतिक्रमण केल्याचे दिसून येते. त्यामुळे विकासकामांचा खोळंबा झाला आहे. बंगाली कॅम्प तसेच बिनबा मासळी बाजाराचा पूर्नविकास करण्यासाठी केंद्र शासनाकडून मदत मागण्यात आली. हा प्रश्नही अद्याप मार्गी लागला नाही. शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत असतानाच अतिक्रमणाची प्रकरणेही वाढत आहेत. या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी मनपाने अद्याप कार्यवाही सुरू केली नाही. परिणामी, ज्या हेतुंसाठी निधीची तरतूद करण्यात आली. ते कागदवरच राहिल्याचे दिसून येते. शहर विकास आराखडा तयार करताना अतिक्रमण कसे दूर करता येईल, याचा प्राधान्याने विचार करावा. अन्यथा अर्थसंकल्पात केलेली तरतूद व नागरिकांना दिलेल्या आश्वासनांवर नागरिकांचा विश्वास उडेल.उद्यान विकासाची कामे ठप्पचंद्रपूर शहर विकास योजना आराखडा दर २० वर्षांनी सुधारित करायचा असतो. त्यासाठी मनपाने पाऊल उचलले आहे. पण, विकास योजना आराखडा व भूसंपादन या संदर्भात प्रशासनाची गतिमानता दिसून येत नाही. शासनाकडून विविध योजनांसाठी अनुदान मिळते. या वर्षी मनपाला २४१.९८ कोटी मिळेल, असा दावा सत्ताधाºयांनी केला. परंतु त्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा झाला नाही. शहरातील विविध वॉर्डांतील उद्यानांचा विकास आराखडा तयार करण्यात आला. हा आराखडा कागदावरच राहिला आहे.