शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

अरेरे ! वृक्षारोपण करण्यासाठी केली शेकडो झाडांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 05:00 IST

घोसरी वनउपक्षेत्र नियत क्षेत्रातील  जंगलात एका वाघिणीचे आपल्या बछड्यासह वास्तव आहे. आता मात्र हे जंगल नष्ट झाल्याने तिचा शोध घेणेही गरजेचे झाले आहे. एवढेच नव्हे तर ट्रॅक्टरने  जंगल नष्ट करण्यासाठी गेलेल्या कामगारांना त्या वाघिणीने माघारी फिरवले. पण हे वनकर्मचारी मात्र त्या वाघिणीला त्या जंगलातून बाहेर केल्याने तिच्यावर आता भटकंती करण्याची पाळी आली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कघोसरी :  वृक्षारोपणाच्या नावाखाली वनविभागाने लाखो झाडांची कत्तल केल्याचा संतापजनक प्रकार पोंभूर्णा वनपरिक्षेत्रातील घोसरी उपवनक्षेत्रात कक्ष क्रमांक ५४६  मध्ये घडला आहे.पोंभूर्णा तालुका वनवैभवाने नटलेला आहे. या तालुक्यात जंगल मोठ्या प्रमाणावर आहे. जंगलात विविध प्रकारच्या प्राण्यांचे वास्तव्य असल्याने पर्यटकांना तालुक्याचे आकर्षण आहे. अशातच घोसरी येथील संरक्षित जंगलाला वनविभागानेच उद्ध्वस्त केल्याने याचा पर्यटनावर मोठा परिणाम होणार आहे. महाराष्ट्रात झाडं वाचवण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केला जात आहे. कोट्यवधी रुपये खर्चून वृक्षारोपण करीत आहे. तर दुसरीकडे चांगले जंगल उद्ध्वस्त केले जात असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. वृक्षलागवडीत या तालुक्याने बाजी मारली. कन्हाळगाव अभयारण्य याच तालुक्यातील आहे. पण घोसरी उपक्षेत्रातील जंगलाला मात्र वनविभागाने भकास केल्याचे चित्र दिसून येत आहे. वृक्षलागवड करण्यासाठी सदर जंगल भुईसपाट करण्याचे काम वनविभागाकडून केले जात आहे. यासाठी मागील महिनाभरापासून रोज ५  ट्रॅक्टरने काम सुरू आहे. ते सर्व काम जबाबदार अधिकाऱ्याने आपल्या जवळच्याच नातेवाईकाला दिले आहे.   

त्या वाघिणीचे काय ?घोसरी वनउपक्षेत्र नियत क्षेत्रातील  जंगलात एका वाघिणीचे आपल्या बछड्यासह वास्तव आहे. आता मात्र हे जंगल नष्ट झाल्याने तिचा शोध घेणेही गरजेचे झाले आहे. एवढेच नव्हे तर ट्रॅक्टरने  जंगल नष्ट करण्यासाठी गेलेल्या कामगारांना त्या वाघिणीने माघारी फिरवले. पण हे वनकर्मचारी मात्र त्या वाघिणीला त्या जंगलातून बाहेर केल्याने तिच्यावर आता भटकंती करण्याची पाळी आली आहे. 

त्या झाडांची परस्पर विल्हेवाट-    सदर जंगलात अनेक प्रकारची वृक्ष मोठ्या डौलाने उभी होती. पण आपले हित साधण्यासाठी या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. या झाडांची लाकडे  ट्रॅक्टर व बैलगाडीने विकल्याचे बोलले जात आहे. आजही  कत्तल केलेली शेकडो झाडे पडलेली असून विल्हेवाट लावण्याची तयारी सुरू आहे.

पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी उपक्षेत्रातील जंगलात वन विभागाने अनेक झाडांची कत्तल केली. यामुळे जंगलातील वन्यजीव भरकटलेला आहे. या वृक्षतोड प्रकरणात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.- अविनाशकुमार वाळके, वन्यजीव पशू-पक्षीप्रेमी, पोंभुर्णा

घोसरी उपक्षेत्रामध्ये वृक्षलागवड करण्याचे नियोजित असल्याने व मजूरवर्ग मिळत नसल्याने ट्रॅक्टरच्या साहाय्याने जंगल साफ करण्यात येत आहे.-आम्रपाली खोब्रागडे,वनपरिक्षेत्र अधिकारी, पोंभुर्णा

 

टॅग्स :forest departmentवनविभाग