शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

महामंडळाच्या संपादरम्यान काम केलेल्यांनाच मिळाला पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 05:00 IST

एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. मागील एक महिन्यापेक्षा अधिक काळापासून संप सुरू असल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये पाच हजार रुपयांची वाढ करण्यात आली. तसेच कामावर रुजू न होणाऱ्या शंभर कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली. चारही आगारातील तसेच ९६ जणांचे निलंबन करण्यात आले. तरीसुद्धा बहुतांश कर्मचारी कामावर रुजू होण्यास तयार नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. नोव्हेंबर महिन्याचा पगार एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला असून, केवळ काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार काढण्यात आला आहे. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. मागील एक महिन्यापेक्षा अधिक काळापासून संप सुरू असल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये पाच हजार रुपयांची वाढ करण्यात आली. तसेच कामावर रुजू न होणाऱ्या शंभर कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली. चारही आगारातील तसेच ९६ जणांचे निलंबन करण्यात आले. तरीसुद्धा बहुतांश कर्मचारी कामावर रुजू होण्यास तयार नाहीत. काही कर्मचारी चार ते पाच दिवस, काही दहा-बारा दिवस कर्तव्यावर रुजू झाले आहेत. याच कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याचा पगार ७ व ८ डिसेंबरला खात्यामध्ये जमा करण्यात आला असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी स्मिता सुतावणे यांनी दिली. मात्र इतर कर्मचाऱ्यांचा पगार जमा झाला नसल्याने ओरड सुरु आहे.

११८ कर्मचारी कर्तव्यावरमहामंडळातील चारही आगारात एकूण १३७२ कर्मचारी आहेत. मात्र, बहुतांश कर्मचारी संपावर आहेत. बुधवारी प्रत्यक्ष स्थिती ११८ कर्मचारी कर्तव्यावर तर काही सुट्यांवर असे एकूण २०० कर्मचारी कर्तव्यावर आहेत, 

अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्याकर्तव्यावर रुजू होण्यासाठी शासनाने पाच हजार रुपयांची वेतनवाढ दिली. मात्र, तरीसुद्धा कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत. त्यामुळे महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या बदल्या सुरू केल्या. पहिल्याच दिवशी प्रशासकीय विभागातील आठ जणांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आताही बदल्यांचे सत्र सुरूच आहे. 

मंगळवारी धावल्या दोन बस मागील दीड महिन्यापासून महामंडळाच्या बसफेऱ्या बंद आहेत. मात्र मंगळवारी वरोरा डेपोतून एक व चंद्रपूर डेपोतून एक अशा दोन बसफेऱ्या धावल्या. यावेळी चालक-वाहकांनी थोडा गोंधळ केला. मात्र, काही वेळानंतर वरोरा ते भद्रावती व चंद्रपूर डेपोतून सुटलेली बस मूलपर्यंत धावली असल्याची माहिती आहे. वरोरा आगारातून धावलेल्या बसने चार हजाराच्या व रुपयांचा तर चंद्रपूर बसस्थानकातून धावलेल्या बसने दीड हजार रुपयांच्या जवळपासच उत्पन्न कमविले असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप