घनश्याम नवघडे/रवि रणदिवे नागभीड/ब्रह्मपुरीज्याच्या खांद्यावर विश्वासाने मान ठेवावी, ज्या हातांनी थोपटून थोपटून झोपवावे, ज्या हातांनी ममत्वाने प्रेमाचे घास मुलांच्या ओठात भरवावे, त्याच हातांनी पोटच्या मुलींचा गळा आवळला. निर्दयपणाचा कळसही एवढा की, पाण्यात बुडवून बुडवून दोघींचा जीव घ्यावा ! एखाद्या क्रूरकर्म्यालाही शरम वाटावी, असा कसाईपणा करणाऱ्या तामदेव झरकर या निर्दयी बापाच्या क्रौर्यकर्मामुळे पारडी (ठवरे) हे गाव शहारले आहे. पारडी हे अडीच ते तीन हजार लोकसंख्येचे गाव. नागभीडपासून दहा किलोमीटर अंतरावर हे गाव असून गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. हा नराधम बापसुद्धा शेती व मजुरीची कामे करतो. लोकांच्या सांगण्यानुसार तो नेहमी एकलकोंडा आणि आपल्याच विचारात राहायचा.सदर प्रतिनिधीने बुधवारी (दि.२३ ) सकाळी पारडी येथे भेट दिली तेव्हा सर्वत्र संताप आणि संताप व्यक्त होत होता. मुलींचा काळ ठरलेल्या त्या नराधम बापास गावातील शोकमग्न नागरिक शिव्यांची लाखोळीही वाहात होते. मुलींचा असा अंत होण्यापूर्वीच काळाने त्या नगराधमाचे हात का आखडले नाहीत, अश्या संतापजनक प्रतिक्रियासुद्धा लोक व्यक्त करीत होते.बापच मुलींचा काळ ठरल्याची माहिती माहिती कळताच त्यांच्या घरासमोर गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती. या गर्दीतून संताप आणि केवळ संताप व्यक्त होत होता. सदर प्रतिनिधीने गावातून फेरफटका मारला असता संपूर्ण गावावर शोककळा जाणवली. गावचे व्यवहारही जागच्या जागी थांबले होते. अनेकांच्या तर चुलीही आज पेटल्या नव्हत्या. ‘तिची’ विषष्ण नजरज्या मुलींना लहानाचे मोठे केले. अंगाखांद्यावर खेळवले, वाढवले त्या मुलींचा खुद्द जन्मदात्याकडूनच असा शेवट झाला, हे ऐकूण त्यांची अभागी माता एवढी हादरली की तिच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हते. तीन दिवसांपासून मुली दिसत नसल्याने काळजीने खोल गेलेल्या डोळ्यातील अश्रुही आटले होते. त्या माऊलीचे विव्हळणे बघणाऱ्यांचेही काळीजत चिरत होते.
केवळ आक्रोश आणि आक्रोश
By admin | Updated: April 23, 2015 00:59 IST