शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सरकारकडून केवळ आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 23:31 IST

भाजपा सरकार केवळ घोषणाबाज आहे. आश्वासनांची पूर्तता करण्यात ते अपयशी ठरले आहे, असा आरोप आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. उपरी काँग्रेसच्या वतीने बुधवारी आयोजित शेतकरी, शेतमजूर व बेरोजगार मेळाव्यात ते बोलत होते.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : उपरी येथे काँग्रेसचा शेतकरी, शेतमजूर मेळावा

ऑनलाईन लोकमतसावली: भाजपा सरकार केवळ घोषणाबाज आहे. आश्वासनांची पूर्तता करण्यात ते अपयशी ठरले आहे, असा आरोप आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. उपरी काँग्रेसच्या वतीने बुधवारी आयोजित शेतकरी, शेतमजूर व बेरोजगार मेळाव्यात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे तर प्रमुख पाहुणे म्हणून गडचिरोली जि.प. सदस्य अ‍ॅड. राम मेश्राम, माजी सभापती दिनेश चिटनुरवार, तालुका अध्यक्ष यशवंत बोरकुटे, महिला तालुकाध्यक्ष उषा भोयर, माजी उपसभापती राकेश गड्डमवार, सावलीच्या नगराध्यक्ष रजनी भडके, उपाध्यक्ष विलास यासलवार, विजय मुत्यालवार, पं.स. सदस्य विजय कोरेवार, भाष्कर गड्डमवार, विलास भांडेकर, शंकर बोदलकर, जि.प. सदस्य वैशाली शेरकी, सरपंच शिला म्हशाखेत्री आदी उपस्थित होते.आ. वडेट्टीवार म्हणाले, भाजप सरकारने महाराष्ट्रातील जिल्हा परिषदच्या १३०० शाळा बंद करून गरीब मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा घाट घातला आहे. कर्जमाफीच्या नावावर अनेक जाचक अटी लावून शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफी दिली नाही.जनतेच्या पैशाची केवळ उधळपट्टी केली जात आहे. कोरगाव भीमा येथे जातीय दंगली घडविणाऱ्या संभाजी भिडे व विनायक एकबोटे यांना अटक करण्याचे सोडून संरक्षण देण्याचे काम करीत आहे.जातीय तेढ निर्माण करणारे व शेतकरी, शेतमजूरविरोधी सरकार असल्याने येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदारांनी जागा दाखवा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. श्रीमंतावर मेहरबान आणि गरीबांवर अन्याय हेच सुरू असल्याची टीका त्यांनी मेळाव्यात केली. गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी आणून बारमाही सिंचनाची व्यवस्था केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. यासाठी ३५० कोटींची निविदा मंजूर करण्याचे काम येत्या काही दिवसात होणार असल्याचेही आ. वडेट्टीवार यांनी नमूद केले. यावेळी अन्य पदाधिकाऱ्यांनीही विचार मांडले.उपरी येथील सरपंच तथा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आशिष मनबत्तुनवार आणि भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्ष बळकट करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचे आश्वासन कार्यकर्त्यांनी दिले.संचालन प्रविण गेडाम यांनी केले.आभार यशवंत बोरकुटे यांनी मानले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.