शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सर्व समस्यांचे एकमेव उत्तर म्हणजे शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 06:00 IST

शिक्षण, आरोग्य, शेती, रोजगार आदी क्षेत्रातील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून विद्यार्थी विकासाला आपण प्राधान्य देणार असल्याचे मत राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. बल्लारपूर तालुक्यातील येनबोडी येथे तालुकास्तरीय बाल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : बल्लारपूर तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जगातल्या सर्व समस्यांचे एकमेव उत्तर म्हणजे शिक्षण. अनेक समस्यांच्या निराकरणाचा हा रामबाण उपाय आहे. गेली ५ वर्षे जिल्ह्यातील विविध समस्या सोडविण्यासाठी मंत्री म्हणून मी प्रयत्नांची शर्थ केली. यापुढे आमदार म्हणून विधीमंडळात विविध संसदीय आयुधांचा वापर करत समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मी प्रयत्न करेन. शिक्षण, आरोग्य, शेती, रोजगार आदी क्षेत्रातील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून विद्यार्थी विकासाला आपण प्राधान्य देणार असल्याचे मत राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. बल्लारपूर तालुक्यातील येनबोडी येथे तालुकास्तरीय बाल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले, पंचायत समितीच्या सभापती इंदिरा पिपरे, जिल्हा परिषद सदस्या वैशाली बुद्धलवार, पंचायत समितीचे उपसभापती सोमेश्वर पद्मगिरीवार, जि. प. सदस्य अ‍ॅड. हरीश गेडाम, माजी सभापती गोविंद पोडे, भाजपचे तालुकाध्यक्ष किशोर पंदिलवार, गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे, कोर्टीमक्ताचे सरपंच गोविंद उपरे उपस्थित होते. आमदार मुनगंटीवार पुढे म्हणाले, तालुकास्तरीय बालक्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमातुन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. सांघिक भावना या माध्यमातुन विकसित होते. जिल्ह्यातील अनेक समस्यांची सोडवणूक गेल्या ५ वर्षात मंत्री म्हणून करू शकलो याचा मला आनंद आहे. प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिन या दोन दिवशी आपण भारत माता की जय म्हणतो. मात्र उर्वरित ३६५ दिवस हिच कृती सातत्याने करण्याची आवश्यकता आहे. आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थी सर्वच क्षेत्रात आघाडीवर राहावे, आदर्श विद्यार्थी जिल्ह्यात घडावे यादृष्टीने मिशन शक्ती, मिशन सेवा असे अनेक उपक्रम गेल्या ५ वर्षांत आम्ही राबविले. यापुढील काळातही ही प्रक्रिया अधिक सक्षम व सदृढ व्हावी यावर आपला भर राहील, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी जि. प. सदस्य संध्या गुरनुले व अन्य मान्यवरांची भाषणे झालीत. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार