शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

डीटीएड्च्या १८७५ जागांसाठी केवळ ५४ अर्ज

By admin | Updated: July 1, 2017 00:33 IST

मागील सात वर्षांपासून सीईटी परीक्षा झाली नाही. त्यामुळे लाखो डीटीएड् पदविकाधारक बेकार आहेत.

विद्यार्थ्यांची पाठ : महाविद्यालये बंद होण्याच्या मार्गावर परिमल डोहणे । लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील सात वर्षांपासून सीईटी परीक्षा झाली नाही. त्यामुळे लाखो डीटीएड् पदविकाधारक बेकार आहेत. परिणामी अनेक विद्यार्थ्यांनी डीटीएड् पदविका शिक्षणाकडे पाठ फिरवली. या पार्श्वभूमीवर ३१ मेपासून डीटीएड्ची आॅनलाईन प्रवेश प्रकिया सुरु झाली. मात्र प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम दिवशी फक्त ५४ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले. त्यापैकी फक्त २५ विद्यार्थ्यांनी अर्जाची पडताळणी केली. जिल्ह्यात एकूण एक हजार ८७५ जागा आहेत. मात्र ५४ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज सादर केल्यामुळे अनेक जागा रिक्त राहणार असून डीटीएड् महाविद्यालये बंद होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी महाविद्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.चंद्रपूर जिल्ह्यात एक शासकीय महाविद्यालय, एक शासन अनुदानित महाविद्यालय, दोन अल्पसंख्याक महाविद्यालय व २५ शासन मान्यता प्राप्त महाविद्यालय असे एकूण २९ डीटीएड् महाविद्यालये आहेत. त्यांची प्रवेश क्षमता एक हजार ८७५ आहे. यासाठी ३१ मेपासून प्रवेश प्रक्रिया सुरु झाली. त्यात जिल्ह्यातील ५४ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यापैकी २५ विद्यार्थ्यांनी अर्जाची पडताळणी केली. त्यामुळे जिल्ह्यातील डीटीएड् महाविद्यालयातील अनेक जागा रिक्त राहणार आहेत.पूर्वी डीटीएड्च्या प्रवेशासाठी रांगा लागत होत्या. मात्र शासनाने अनेक खाजगी डीटीएड् महाविद्यालयाला मान्यता दिली. त्यामुळे गलोगल्ली डीटीएड् महाविद्यालय उघडण्यात आले. परिणामी अनेक डीटीएड् बेरोजगार पदवीधारकांची फौज निर्माण झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवली आहे. परिणामी अनेक महाविद्यालयातील जागा रिक्त राहणार आहेत. मुदतवाढ देऊनही अल्प प्रतिसादडीटीएड्साठी आॅनलाईन अर्ज करण्यासाठी ३१ मेपासून सुरुवात झाली. अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ जून व अर्ज पडताळणीची शेवटची तारीख २० जून होती. मात्र अंत्यत कमी अर्ज दाखल झाल्यामुळे प्रवेश अर्ज सादर करण्याची तारीख वाढवून ३० जून करण्यात आली. तर अर्ज पडताळणीची तारीख १ जुलैपर्यंत वाढवण्यात आली. मात्र तरीही विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले नाही. खाजगी महाविद्यालयांवर संक्रातजिल्ह्यात २७ खाजगी महाविद्यालये आहेत. त्यांची प्रवेश फी १२ हजार तर शासकीय महाविद्यालयाची प्रवेश फी तीन हजार २०० रुपये आहे. पूर्वी डीटीएड्ला लाखो रुपये डोनेशन देऊन प्रवेश निश्चीत केला जायचा मात्र आता विद्यार्थ्यांनी डीटीएड्कडे पाठ फिरवल्याने अनेक खाजगी महाविद्यालयावर संक्रात येणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे. कर्मचारी होणार बेरोजगारडीटीएड्चे आॅनलाईन प्रवेश अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशीसुद्धा प्रवेशासाठी विद्यार्थ्यानी अल्पसा प्रतिसाद दिल्यामुळे फक्त ५४ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले. त्यापैकी २५ विद्यार्थ्यांनी शासकीय डीटीएड् विद्यालयात अर्जांची पडताळणी केली. त्यामुळे अनेक महाविद्यालयातील जागा रिक्त राहणार आहेत. परिणामी महाविद्यालये बंद होण्याच्या मार्गावर आहेत.सात वर्षांपासून सीईटी परीक्षा नाहीपूर्वी हमखास नोकरी मिळण्याचे शिक्षण म्हणून डीटीएड्कडे बघितले जायचे. मात्र मागील सात वर्षांपासून एकदाही सीईटी परीक्षा झाली नाही. तसेच २०१० ला केंद्रीय शिक्षक भरती झाली. त्यानंतर आजपर्यंत एकदाही शिक्षक भरती झालेली नाही.