शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

२९ हजार ७६२ मजुरांनाच मिळाला रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 06:00 IST

महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमाची अंमलबजावणी १९७७ पासून सुरू झाली. राज्यात महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम १९७७ नुसार दोन योजना सुरू होत्या. ग्रामीण भागात अकुशल व्यक्तींकरिता रोजगार हमी योजना व महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, १९७७ कलम १२ (ई) नुसार वैयक्तिक लाभाच्या योजनांचा समावेश होता. सदर योजनांना शासनाच्या निधीतून अर्थसहाय्य मिळत होते.

ठळक मुद्देजिल्ह्यातील मनरेगाची स्थिती : ८५५ ग्रामपंचायतींमध्ये ४९९ कामे सुरू

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील रब्बी हंगामातील कामे अंतिम टप्प्यात असल्याने ग्रामीण व आदिवासी भागातील मजुरांना रोजगाराची चिंता भेडसावत आहेत. त्यामुळे जॉबकार्डधारक मजुरांच्या नजरा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांकडे लागल्या. सद्य:स्थितीत ८५५ ग्रामपंचायतींध्ये ४९९ कामे सुरू असून त्यावर केवळ २९ हजार ७६२ मजुरांच्याच हाताला काम मिळाले आहे.महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमाची अंमलबजावणी १९७७ पासून सुरू झाली. राज्यात महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम १९७७ नुसार दोन योजना सुरू होत्या. ग्रामीण भागात अकुशल व्यक्तींकरिता रोजगार हमी योजना व महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, १९७७ कलम १२ (ई) नुसार वैयक्तिक लाभाच्या योजनांचा समावेश होता. सदर योजनांना शासनाच्या निधीतून अर्थसहाय्य मिळत होते. सन २००५ रोजी केंद्र्र शासनाने रोजगार हमी कायदा तयार करून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा असे नामांतरण केले. या योजनेतंर्गत प्रौढ व्यक्तीला अकुशल रोजगाराचा हक्क आहे. त्यासाठी कुटुंबनिहाय जॉबकार्ड तयार केले जाते. नोंदणीकृत कुटुंबाला वर्षभर १०० दिवस प्रती कुटुंब केंद्रीय निधीतून व आश्यकतेनुसार जादा दिवसांसाठी राज्य निधीतून कामाची हमी देण्याची कायद्यात तरतूद आहे.ग्रामपंचायतींनी झटकावा आळसमनरेगाची कामे सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतींची आळस झटकून प्रशासनाकडे पाठपुरावा केला पाहिजे. कुटुंब नोंदणी करणे, ग्रामसभेतून रोजगाराच्या गरजेचा पूर्व वार्षिक अंदाज घेणे, नियोजन आराखडा व कामाचे प्राधान्य ठरविणे, सामाजिक अंकेषण व पारदर्शकतेकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.२ हजार ४९ मजुरांना प्रतीक्षा१५ तालुक्यात २ हजार ४९ मजुरांनी बँकेचे पासबूक व आधारक्रमांक अद्याप दिले नाही. त्यामुळे रोजगारापासून वंचित राहावे लागत आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मनरेगाच्या कामात सामावून घेण्यात येणार आहे.मजुरांसाठी सवलतीगावापासून ५ किमी पेक्षा जास्त अंतरावर रोजगार दिल्यास १० टक्के जास्त मजुरी द्यावी लागते. अकुशल रोजगार उपलब्ध न केल्यास दैनिक मजुरीच्या २५ टक्के बेरोजगार भत्ता, पिण्याचे पाणी, प्राथमिक उपचार व ६ वर्षांखालील मुलांना सांभाळण्याची सोय, रूग्णसेवा, अपंगत्व अथवा मृत्यू आल्यास ५० हजार सानुग्रह अनुदान देण्याची जबाबदारी पंचायत समिती व जिल्हा परिषदेची आहे.सात तालुक्यात मनरेगाची अत्यल्प कामे८५५ ग्रामपंचायतींमध्ये ४९९ कामे सुरू आहेत. सर्वाधिक कामे ब्रह्मपुरी, चिमूर, नागभीड, मूल, सावली, वरोरा व सिंदेवाही ब्लॉकमध्ये मंजूर झाली. १५ ब्लॉकमध्ये २९ हजार ७६२ मजुरांच्या हाताला काम मिळाले. मात्र बल्लारपूर, पोंभुर्णा, कोरपना, राजुरा, चंद्रपूर, भद्रावती, जिवती तालुक्यात अत्यल्प कामे सुरू आहेत. शेतीची कामे संपताच शेकडो मजुरांवर अन्यत्र स्थलांतरण करण्याची वेळ येऊ शकते.