शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन सातबाऱ्यामुळे डोकेदुखी वाढली

By admin | Updated: November 17, 2016 01:51 IST

शासनस्तरावर शेतकऱ्यांना सोईचे व्हावे म्हणून या आधुनिक युगात आॅनलाईन सातबारा ताबडतोब मिळावा आणि त्याद्वारे कामे सोईस्कर व्हावी,

नागरी (रेल्वे): शासनस्तरावर शेतकऱ्यांना सोईचे व्हावे म्हणून या आधुनिक युगात आॅनलाईन सातबारा ताबडतोब मिळावा आणि त्याद्वारे कामे सोईस्कर व्हावी, या दृष्टीकोनातून शासनस्तरावर कितीतरी खर्च करण्यात आला. आणि जिल्हा पातळीवर आॅनलाईन प्रणाली पारदर्शकपणे व्हावी, असे निर्देश देण्यात आले. पण शासनस्तरावरील या आॅनलाईन पारदर्शकतेचा बट्याबोळ झाला. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आॅनलाईन सातबारा शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.महाराष्ट्र शासन व टाटा कन्सलटन्सी यांच्या संयुक्त उपक्रमातून महाआॅनलाईन मार्फत नियुक्त करण्यात आलेल्या महा- ई सेवा केंद्रातून शासनाने महसूल विभागातील विविध सेवांचा समावेश केलेला आहे. गावातील नागरिकांना कमी वेळेत सेवा चांगल्याप्रकारे मिळावी हा शासनाचा मानस आहे. परंतु वास्तविक सद्यस्थिती वेगळी आहे. आॅनलाईन सातबारा काढण्यासाठी शेतकऱ्यांना महा-ई-सेवा केंद्रात गेल्यानंतर त्यावर वेगळीच माहिती दिसत आहे. आजच्या परिस्थितीत सातबाऱ्यावर असलेली नोंद ही सन २०१३ पर्यंत अद्यावत असलेली आहे. यामध्ये शेतकऱ्याची भोगवटा नोंद, फेराफर नोंद, पीक पेरा नोंद, बँक बोझा या संबंधाने कुठल्याही प्रकारची अद्यावत माहिती नाही. यामुळे शेतकऱ्यांना विविध शासकीय कामकाजामध्ये काम करताना अडचणी निर्माण होत आहे.सद्यस्थितीत शासनस्तरावर डिजीटलायझेशनचे काम चालु आहे. शासनाच्या महाभुमिलेख या आज्ञावलीमध्ये आॅनलाईन सातबारा नोंदणी संबंधाने शासनाने तहसील कार्यालयाला नोंदणी कक्ष चालु केले. परंतु शासनाने नोंदणी करताना तलाठी आॅफीसमधून मिळणारा हस्तलिखीत सातबारा देणेसुद्धा बंद केले. त्यामुळे शेतकऱ्यांना हस्तलिखीत सातबारा मिळण्यापासूनच वंचित रहावे लागत आहे. एकीकडे आॅनलाईनचा गाजावाजा असताना त्यामध्ये त्रुटी तर दुसरीकडे हस्तलिखीत सातबारा मिळण्यापासून शेतकरी वंचित आहेत. या शासकीय कामकाजात शेतकरीच होरपळला जात आहे. त्यामुळे शासनस्तरावर हा प्रश्न केव्हा निकाली निघणार, यामुळे शेतकरी कमालीचा चिंतेत पडला आहे. (वार्ताहर)