शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या आॅनलाईन उपस्थिती व सेल्फीवर बहिष्कार

By admin | Updated: January 10, 2017 00:46 IST

राज्यातील प्राथमिक शाळांची विद्यार्थी व शाळा डाटाबेस सरल प्रणाली, एम. डी. एम शिष्यवृत्ती माहिती, ...

शिक्षक संघटनांमध्ये रोष : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनचंद्रपूर : राज्यातील प्राथमिक शाळांची विद्यार्थी व शाळा डाटाबेस सरल प्रणाली, एम. डी. एम शिष्यवृत्ती माहिती, शालार्थ वेतन प्रणाली, आधार कार्ड माहिती यासारखी शाळेची सर्व माहिती आॅनलाईन भरली जात आहे. त्यातच ३ नोव्हेंबरला विद्यार्थ्यांची सेल्फी काढण्याचा शासन निर्णय निर्गमीत करून नव्या वर्षात या निर्णयाची अमलबजावणी करण्याचे आदेश दिले. या निर्णयावर जिल्ह्यातील बारा शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त करीत दर सोमवारी सेल्फी काढून पाठविण्याच्या सरल प्रणालीवर बहिष्कार टाकला. विद्यार्थ्यांच्या आॅनलाईन उपस्थितीसाठी अ‍ॅप तयार करण्यात आली असून या अ‍ॅपवर दररोज उपस्थिती नोंदविण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये संगणक व इंटरनेटची सुविधा नाही. मोबाईल कव्हरेज सुद्धा राहत नाही. त्यामुळे आॅनलाईन उपस्थिती सादर करणे शिक्षकांना कठीण आहे. शिवाय या कामात शिक्षकांचा वेळ वाया जाणार आहे. पुर्वीच शिक्षणाचे व शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यातच आॅनलाईन माहिती, सेल्फीसारखे निर्णय घेऊन शिक्षकांच्या अडचणी वाढविल्या आहेत. त्यामुळे या निर्णयावर फेरविचार करून निर्णय रद्द करावा, यासाठी जिल्ह्यातील बारा शिक्षक संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)या संघटनांचा बहिष्कारनववर्षापासून महिन्याच्या दर सोमवारी वर्गाचा सेल्फी काढून सरल प्रणालीवर पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहे. या निर्णयावर बारा शिक्षक संघटनांनी सोमवारी बहिष्कार टाकला व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, अखिल चंद्रपूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र प्रदेश केंद्रप्रमुख संघ, महाराष्ट्र पदविधर शिक्षक व केंद्रप्रमुख संघ, महाराष्ट्र राज्य ग्रेड मुख्याध्यापक महासंघ, मुख्याध्यापक असोशिएशन, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद, प्राथमिक शिक्षक भारती या संघटनांचा समावेश आहे.