शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

१६ हजार उमेदवारांचे आॅनलाईन अर्ज

By admin | Updated: July 22, 2015 01:30 IST

जिल्ह्यातील ६२८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या सोमवार या अंतिम दिवसापूर्वी ...

६२८ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक : ४२ ग्रामपंचायतीत पोटनिवडणूकचंद्रपूर : जिल्ह्यातील ६२८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या सोमवार या अंतिम दिवसापूर्वी १६ हजार १८६ उमेदवारांनी आॅनलाईन अर्जाच्या प्रिंट निवडणूक विभागाकडे सादर केल्या आहेत. अर्जाची छाणणी झाल्यानंतर व २३ जुलैला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर किती उमेदवार रिंगणात राहणार, हे निश्चीत होणार आहे. जिल्ह्यातील ६२८ ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक तर ४३ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक होत आहे. १३ जुलैपासून आॅनलाईन नामनिर्देशनपत्र मागविण्यात आले होते. २० जुलै ही आॅनलाईन नामनिर्देशन अर्जाची अखेरची तारीख होती. १९ जुलैपर्यंत तब्बल १६ हजार १८६ उमेदवारांनी आॅनलाईन अर्ज केले. मात्र आॅनलाईन अर्जाची प्रिंट केवळ ४ हजार १४० उमेदवारांनीच दाखल केले होते. वरोरा तालुक्यातील सर्वाधिक १ हजार ९८८ तर ब्रह्मपुरी तालुक्यात १ हजार ९२६ उमेदवारांनी आॅनलाईन अर्ज केले आहेत. बल्लारपूर ३१६, भद्रावती १ हजार ४५४, चंद्रपूर १ हजार ३३१, चिमूर १ हजार ८६७, गोंडपिंपरी १ हजार २०, जिवती २७, कोरपना ४४४, मूल १ हजार २४, नागभीड १ हजार ३४२, पोंभूर्णा ५५०, राजुरा ५५५, सावली १ हजार १७७ तर सिंदेवाही तालुक्यातून १ हजार १६५ उमेदवारांनी आॅनलाईन अर्ज केले आहेत. २१ जुलैपासून अर्जाची छानणी होणार असून २३ जुलै रोजी संध्याकाळी ४ पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. त्याच दिवशी ४ वाजतानंतर उमेदवारांना चिन्हांचे वाटप होणार आहे. मतदान ४ आॅगस्ट रोजी तर ६ आॅगस्टला मतमोजणी होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी) आदर्श गावात अविरोध निवडणूकमूल : तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी १ हजार २४ जणांनी नामांकन दाखल केले. सर्वाधिक नामांकन तालुक्यातील चिरोली ग्राम पंचायतीमध्ये दाखल करण्यात आले. आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत राजगडने फक्त उमेदवाराऐवढेच नामांक दाखल करुन अविरोध ग्रामपंचायत करण्याचा निर्णय घेतल्याने परंपरा कायम राखली आहे. तालुक्यात एकूण ४८ ग्रामपंचायत असून ३७ ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. ३७ ग्रामपंचायतीमध्ये सदस्य संख्या ३१७ असून यात मारोडा ३७, येरगाव ३०, चिरोली ४८, फिस्कुटी २९, मोरवाही १९, जुनासूर्ला ३०, टेकाडी २५, गांगलवाडी १७, चिमढा २५, राजगड ९, विरई १५, नलेश्वर २४, उथळपेठ १९, मरेगाव २१, राजोली ३५, भवराळा १९, गोवर्धन २०, कवडपेठ २२, डोंगरगाव ३८, हळदी २३, जानाळा १४, सुशी दाबगाव २२, काटवन १५, भादुर्णी २४, मुरमाडीी १५, कोसंबी २६, चितेगाव १९, चिखली २५, चिंचाळा २६, चांदापूर २७, केळझर २६, नवेगाव भूजला २४, बोरचांदली २५, नांदगाव ३०, पिपरी दीक्षित २५, दाबगाव (मक्ता) १९, बोंंडाळा बुज येथे १४ जणांनी नामांकन दाखल केले आहे.गोंडपिंंपरी तालुक्यात १ हजार २० नामांकनगोंंडपिंपरी : तालुक्यात एकूण ४३ ग्राम पंचायतीची निवडणूक होत असून सात ग्राम पंचायमध्ये पोटनिवडणूक होत आहे. तालुक्यात मोठ्या ग्राम पंचायतीमध्ये मोडणाऱ्या भं. तळोधी, धाबा, आक्सापूर, करंजी, वढोली, तोहोगाव, लाठी आदींचा समावेश असून यासाठी शेकडोच्या संख्येत नामांकन दाखल झाले आहे. सोमवारी स्थानिक तहसील कार्यालय परिसरात नागरिकांनी नामांकन दाखल करण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.