शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

हुंडा मागणाऱ्यास एक वर्षाचा कारावास

By admin | Updated: September 26, 2015 00:59 IST

साखरपुडा झाल्यानंतर हुंड्यासाठी तगादा लावून लग्नाची तारिख काढण्यास नकार देणाऱ्या आरोपीला चंद्रपूरच्या प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांनी एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.

न्यायालयाचा दणका : ब्रह्मपुरी तालुक्यातील घटनाचंद्रपूर : साखरपुडा झाल्यानंतर हुंड्यासाठी तगादा लावून लग्नाची तारिख काढण्यास नकार देणाऱ्या आरोपीला चंद्रपूरच्या प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांनी एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. जगदीश हरीजी बढोले (३७) रा. नवेगाव बांध ता. अर्जूनी मोर जि. गोंदिया असे आरोपी नाव आहे.ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अऱ्हेर नवरगाव येथील महिलेचे लग्न नवेगाव बांध येथील जगदीश हरीजी बडोले याच्या सोबत जुडले. २७ नोव्हेंबर २०११ रोजी रितीरिवाजाप्रमाणे साखरपुडा झाला. त्यानंतर महिलेचे नातेवाईक लग्नाची तारीख काढण्याकरीता नवेगाव बांध येथे घरी गेले. त्यावेळी त्यांना लग्नाच्या तारखेकरीता अऱ्हेर नवरगाव येथे येत असल्याचे सांगून १५ एप्रिल २०१२ रोजी नातेवाईकासह आला. त्यानंतर त्याने लग्न करावयाचे असेल तर हुंडा म्हणून ५० हजार रुपये नगदी व १५ ग्रॅम सोन्याची चैनची मागणी केली. मागणी पुर्ण झाली तरच लग्नाची तारीख काढू असे सांगून निघून गेला. मुलीच्या वडीलांनी वारंवार विनंती करुन सुद्धा जगदीश बडोले हुंड्याची मागणी पूर्ण झाल्याशिवाय लग्नाची तारीख काढायला तयार नव्हता. त्यामुळे २६ जानेवारी २०१२ रोजी या प्रकरणी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मुलीच्या तिच्या तक्रारीवरुन कलम ४ हुंडा प्रतिबंधक कायदा अन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास भुपेंद्र पांडूरंग लेनगुरे यांनी करुन आरोपीस अटक केली. गुन्ह्याचे दोषारोपपत्र सहायक फौजदार रामभाऊ शहाणे यांनी न्यायालयात सादर केले. या गुन्ह्यात न्यायालयाने एकूण ८ साक्षदार तपासले. सर्व साक्षदारांनी फिर्यादीच्या बाजूने साक्ष नोंदविली. साक्ष पुराव्यावरुन प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाारी के. के. चाफले यांनी आरोपी जगदीश बडोले याला एक वर्षे कारावास व रुपये १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयात सरकार पक्षातर्फे सहायक सहकारी अभियोक्ता अ‍ॅड. रणदिवे यांनी काम पाहिले. (स्थानिक प्रतिनिधी)