शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

एक वर्षापासून वनविभागाचे मजूर पगारापासून वंचित

By admin | Updated: August 3, 2016 01:54 IST

वनविकास महामंडळाचे झरण क्षेत्रातील कक्ष क्र.१३२ व १६ मध्ये काम केलेल्या मजुरांची मजुरी वर्षभरापासून देण्यात आलेली नाही.

मजूर त्रस्त : कन्हारगाव वनक्षेत्रातील प्रकार कोठारी : वनविकास महामंडळाचे झरण क्षेत्रातील कक्ष क्र.१३२ व १६ मध्ये काम केलेल्या मजुरांची मजुरी वर्षभरापासून देण्यात आलेली नाही. त्यामुळे मजुरांत नाराजी व संताप पसरला आहे. मध्य चांदा वनविकास महामंडळ वनप्रकल्प विभाग बल्लारशाह अंतर्गत कन्हारगाव वनक्षेत्रातील कक्ष क्र. १३२ मध्ये आॅक्टोबर २०१५ ला २५ हेक्टरचे डिर्माकेशन करण्यात आले. तसेच कक्ष क्र. १६ मध्ये १०० टक्के मोजणीची कामे मजुरांकडून करण्यात आले. सदर कामाची देखरेख वनरक्षक सिंगम यांच्याद्वारे केली होती. काम पूर्ण होवून वर्ष संपत आहे. तरीही मजुरांची मजुरी अद्यापपर्यंत अदा करण्यात आलेली नाही. याबाबत मनोज बावणे, चेतन दुर्गे, राहूल वनकर, रविंद्र कोहळे, पंकज पेन्दोर व बंडू बोरकर या मजुरांनी सहायक व्यवस्थापक प्रफुल्ल वाघ तसेच वनाधिकारी प्रफुल्ल निकोडे यांच्याकडे विचारणा केली असता, सदर कामाचे पैसे वनरक्षक सिडाम यांना काम संपताच देण्यात आले. मात्र त्यांनी मजुरांना मजुरी दिली नाही. ही बाब गंभीर असून संबंधित वनरक्षकास विचारणा करून त्याच्यावर सक्त कारवाई करण्यात येवून मजुरांना त्वरित मजुरी देण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले. याबाबत वनरक्षक सिंगम यांना विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवी करुन संबंधित कामाचे पैसे मिळाल्यानंतर मजुरांना मजुरी देण्यात येईल. त्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार अन्यथा ‘तुम्हाला जमेल ते करा, मी सर्व चौकशीस पुढे व कारवाईस पुढे जाण्याची तयारी’ असल्याचे सांगितले. (वार्ताहर)