शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार प्रकल्पग्रस्तांचे उपोषण सुरु

By admin | Updated: February 3, 2017 01:01 IST

वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या निषेधार्थ धोपटाळा, सास्ती, कोलगाव, मानोली, भगंगपूर, माथरा येथील एक हजार

वेकोलिचा निषेध : ३ फेब्रुवारीपासून आमरण उपोषणराजुरा : वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या निषेधार्थ धोपटाळा, सास्ती, कोलगाव, मानोली, भगंगपूर, माथरा येथील एक हजार प्रकल्पग्रस्त शेतकरी आज गुरुवारपासून राजुरा येथील तहसील कार्यालयापुढे उपोषणाला बसलेले आहे.मागील पाच वर्षापासून जमिनी संपादित केल्या, सेक्शन ९ लावण्यात आले. मात्र वेकोलि व शासनाच्या दिरंगाईमुळे येथील शेतकरी संतप्त झाले असून जोपर्यंत मोबदला व नोकरी मिळणार नाही, तोपर्यंत लढा सुरु ठेवण्याचा इशारा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी संपादित केल्यामुळे त्या जमिनीवर कर्ज मिळत नाही. जमिनी विकू शकत नाही, अशा परिस्थितीत मुलांचे शिक्षण मुलीचे लग्न करण्यास विलंब होत असून अनेक वेळा मोर्च काढले, धरणे दिले. परंतु शेतकऱ्यांची बाजू ऐकून घ्यायला तयार नाही. त्यामुळे गुरुवारपासून उपोषण सुरु करण्यात आहे. ३ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याची माहिती प्रकल्पग्रस्त शेतकरी विजय चन्ने, बाळू जुलमे, विलास घटे, बालाजी कुबडे, राजु मोहारे, अनिल पायघन, शालू पिंपळकर, मनिषा बोबडे आदींनी दिली. (शहर प्रतिनिधी)साखरीच्या प्रकल्पग्रस्तांवर अन्यायवेकोलिचे अधिकारी केवळ शेतकऱ्यांची लूट करीत असून साखरी येथील शेतकरी निर्मला चौधरी, शेषराव बोंडे, शिला खिरटकर, बंडू धारणे, मोहन धारणे, यांच्या जमिनी घेतल्या. काम सुरु केले. परंतु कुणाला पैसे दिले तर नोकरी दिली नाही. नोकरी दिली तर पैसे दिले नाही. केवळ पोकळ आश्वासने देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात येत असून साखरी, धोपटाळा, सास्ती, कोलगाव, मानोली, भंडागपूर, माथरा, सुबई, चिचोंलीचे प्रकल्पग्रस्त शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.