शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

एक काठी, दोन बिबट अन् ८३ वर्षाचा ‘तरुण’ !

By admin | Updated: December 13, 2014 01:15 IST

रात्रीची स्मशान शांतता. सर्वत्र अंधार. आवाज होता केवळ जमिनीवर आदळणाऱ्या बिबट्याच्या शेपटीचा. बिबट आणि ८३ वर्षाचे आजोबा समोरासमोर.

सचिन सरपटवार भद्रावतीरात्रीची स्मशान शांतता. सर्वत्र अंधार. आवाज होता केवळ जमिनीवर आदळणाऱ्या बिबट्याच्या शेपटीचा. बिबट आणि ८३ वर्षाचे आजोबा समोरासमोर. दोघांमध्ये अंतर केवळ आठ फुटांचे. बिबट खाली बसला अन् आजोबा हातात काठी घेऊन उभे झाले. दोघेही शांत होते. तब्बल एक तास नजरेला नजर भिडवून. काही वेळानंतर बिबट निघून गेला. त्यानंतर पहाटेच्या सुमारास पुन्हा दोन बिबट आणि आजोबा समोरासमोर. आता मात्र एका बिबट्याने हल्ला चढविला. न भीता, न घाबरता केवळ काठीच्या साहाय्याने दोन्ही बिबट्यांना आजोबांनी पळवून लावले.ही परिकथेतील गोष्ट नाही. तर, भद्रावती तालुक्यातील तिरवंजा (मो.) या गावात घडलेली घटना आहे. बिबट्याशी झुंज देणाऱ्या या ८३ वर्षांच्या आजोबाचे लक्ष्मण नारायण येरगुडे असे नाव आहे. वयाने म्हातारे पण मनाने ‘तरुण’ असलेले लक्ष्मण येरगुडे यांनी धैर्य, हिंमत व स्फूर्तीने बिबट्यांशी दिलेली झुंज इतरांचे मनोबल वाढविणारी आहे. ज्या जनावरांना वाचविण्यासाठी त्यांनी स्वत:चा जीव धोक्यात टाकला त्याच जनावरांच्या प्रेमामुळे बिबट्यांशी लढण्याची स्फूर्ती मिळाल्याचे येरगुडे यांनी सांगितले.सायंकाळी ७ वाजता बिबट तिरवंजा गावात शिरला. उद्धव येरगुडेच्या मालकीच्या कालबडीवर त्याने हल्ला केला. मारोती क्षीरसागर यांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी गावकऱ्यांना सांगितले. त्यानंतर ग्रामस्थांनी बिबट्याचा ‘हाका’ केला अन् बिबट तेथून पळून गेला. दरम्यान, लक्ष्मण येरगुडे गावालगत असलेल्या आपल्या शेतात जागली करायला निघाले. त्यांच्या शेतातील मांडवात सात बैल, ११ गाई आणि ११ म्हैशी असे २९ जनावरे बांधुन होते.येरगुडे शेतातील मचाणीवर गेले. तेव्हा त्यांना गाई-म्हशी बुजाडण्याचा आवाज आला. ते मचाणीवरून खाली आले.तेव्हा बघते तर काय, चक्क आठ फुटावर बिबट. बिबट हल्ला करेल म्हणून त्यांनी आवाज केला नाही अन् जागेवरून हललेही नाही. तब्बल एका तासापर्यंत दोघेही एकमेकांकडे टकटक बघत होते. तेवढ्यात दुसरा बिबट काट्यातून बाहेर येऊन त्याने बांधून असलेल्या वासरावर झेप घेतली. आवाजामुळे बिबट त्या दिशेने गेला आणि वासराला मांडवाच्या दूर नेऊन ताव मारणे सुरु केले. येरगुडे यांनी गावात येऊन गावकऱ्यांना घटनेची माहिती दिली. अजून किती जनावर मारेल, या भीतीने येरगुडे कुटुंब, गावकरी, गार्ड रंगारी आदी घटनास्थळावर गेले. या सर्र्वांनी रात्र शेतात काढली. तेव्हा बिबट आला नाही. मात्र पहाटेच्या सुमारास ग्रामस्थ गावात गेले. सकाळी लक्ष्मण येरगुडे मृत कालवड शोधत असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. शेपूट मारून त्यांना खाली पाडले. त्यानंतर लगेच उभे झाले. काठी घेतली ‘पिपड्डे महाराज की जय’ असे म्हणून काठी बिबट्याच्या कानपटात मारली. तीन काठ्या मारल्या अन् बिबट निघून गेला. तेवढ्यात दुसऱ्या बिबट्याने म्हैस व वगाराला जखमी केले. अन् ते बिबट्याचे पिल्लू तोंड फाडून येरगुडेवर हल्ला करण्यासाठी झेपावले. क्षणाचाही विलंब न करता येरगुडेंनी त्यांच्या हातातील काठी त्या पिल्लाच्या तोंडात घातली. त्याच क्षणी ते बिबट्याचे पिल्लू पळून गेले. घटनेनंतर वन विभागाने घटनास्थळावर कॅमेरे लावले. दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा बिबट घटनास्थळावर येवून त्या मृत कालवडीला ओढत नेल्याचे कॅमेरात बंदिस्त झाले.