शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

वरोरा तालुक्याने ओलांडला कोविड लसीकरणाचा एक लाखांचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 05:00 IST

वरोरा तालुक्यात लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. दररोज प्रशासनाकडून लसीकरणाबाबत सत्र राबविण्यात येत आहे. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून नागरिक सकाळपासूनच रांगा लावत आहेत. शहरी भागात लसीकरणाची टक्केवारी ७७.०८ टक्के, तर ग्रामीण भागात ५०.६३ टक्के लोकांचे प्रथम डोस पूर्ण झाले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : तालुक्यात कोविड लसीकरणाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे तालुक्यात लसीकरणाचा एक लाखांचा टप्पा पूर्ण झाला आहे. प्रशासनाकडून लसीकरणाचे सत्र आयोजित करण्यात येत असून दररोज नागरिकांचे लसीकरण होत आहे. आतापर्यंत तालुक्यात १८ वर्षांवरील पात्र लाभार्थ्यांपैकी एकूण एक लाख १ हजार ३५४ लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यापैकी ७७ हजार ८१८ जणांनी लसीकरणाचा पहिला, तर २३ हजार ५३६ जणांनी दोन्ही डोस पूर्ण केले आहे. वरोरा तालुक्यात लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. दररोज प्रशासनाकडून लसीकरणाबाबत सत्र राबविण्यात येत आहे. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून नागरिक सकाळपासूनच रांगा लावत आहेत. शहरी भागात लसीकरणाची टक्केवारी ७७.०८ टक्के, तर ग्रामीण भागात ५०.६३ टक्के लोकांचे प्रथम डोस पूर्ण झाले आहेत. तालुक्यातील २५ गावांत ९० टक्केच्या वर लसीकरण पूर्ण झाले असून कोविडमुक्त ११ गावांत ९५ टक्केच्या वर लसीकरणाचे काम झालेले आहे. तालुक्यात मुबलक प्रमाणात लस उपलब्ध होत आहे. लसीकरणाच्या दिवशी साधारणत: पाच हजार लोकांना लस देण्यात येत आहे. लसीकरणामुळे आपले कोरोनापासून संरक्षण होते. लसीकरणातून आरोग्यास कोणताही प्रकारचा धोका नाही, त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन वरोरा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राठोड, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळू मूंजनकर यांनी केले आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या