शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख आठ हजारांचा सुगंधित तंबाखू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 22:48 IST

दारूची वाहतूक होत असल्याच्या गुप्त माहितीवरून मूल पोलीस गस्तीवर असताना नागपूरमार्गे चंद्रपूरकडे जात असलेल्या .....

ठळक मुद्देगस्तीवर असताना पकडले : पोलीस व अन्न सुरक्षा विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : दारूची वाहतूक होत असल्याच्या गुप्त माहितीवरून मूल पोलीस गस्तीवर असताना नागपूरमार्गे चंद्रपूरकडे जात असलेल्या वेगन आर चार चाकी वाहन क्रं. एमएच ४० ए आर ३४४५ ची तपासणी केली असता त्याठिकाणी सुगंधित तंबाखूच्या २०० ग्रॅम वजनाचे १२०० पाकिट आढळून आले. यावरून मूल पोलिसांनी चारचाकी वाहनासह सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आले आहे. सदर कारवाई शनिवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारात करण्यात आली आहे. अरुण हरिशचंद्र कटारिया (२६), प्रमोद पुुरषोत्तम कायरकर (२४) रा. उमरेड असे आरोपीचे नाव आहे.चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असतानाही दारूविक्रेते जुमानत नाही. दारूची अवैध वाहतूक करून विक्री करीत आहे. पोलीस दारूविक्री करणाºयांवर कारवाई करीत असतानाही दारूविक्रीचे प्रमाण अजुनही कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. नागपूरमार्गे चंद्रपूरला दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मूल पोलिसांना मिळाली.माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे व पोलीस निरीक्षक जसवंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम कुमरे यांनी चामोर्शी नाक्यावर पाळत ठेवली. अशातच अरूण हरिशचंद्र कटारिया (२६), प्रमोद पुुरुषोत्तम कायरकर (२४) रा. उमरेड हे वेगन आर चारचाकी वाहन क्र. एमएच ४० ए ३४४५ ने या ठिकाणी पोहचले. सदर वाहनाच्या सभोवताल काळ्या रंगाचे काचा असल्यामुळे पोलिसाना शंका आली. सदर वाहनाची तपासणी केली. या तपासणीत सदर वाहनात सुगंधीत तंबाखुच्या २०० ग्रॅम वजनातचे बाराशे पॅकेट आढळून आले.पोलिसांनी सदर वाहन जप्त करून पोलीस स्टेशन येथे लावण्यात आले. सदर सुगंधीत तंबाखुची किंमत १ लाख ८ हजार रुपये आहे. तर वाहनाची किंमत २ लाख रुपये आहे. सदर सुगंधीत तंबाखुची वाहतूक केल्या प्रकरणी अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी अमरनाथ सोनटक्के यांनी आरोपींवर अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ कलम ३० (२) (अ) ३ (१) (झेड, झेड) (व्ही) शिक्षा कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे. सुगंधीत तंबाखूव बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू आहे. या अनुषंगाने तपास सुरू आहे.