शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने एक ठार

By admin | Updated: July 30, 2015 01:06 IST

बैलबंंडीने शेतात जात असताना रस्त्यावर जिवंत विद्युत तार तुटून पडली होती. या ताराला स्पर्श झाल्याने शॉक लागून बैल बंडीवरील एक इसम व बैल ठार झाला.

बैलाचाही मृत्यू : दोन जण जखमी, वरोरालगतच्या एकार्जुना शिवारातील घटनावरोरा : बैलबंंडीने शेतात जात असताना रस्त्यावर जिवंत विद्युत तार तुटून पडली होती. या ताराला स्पर्श झाल्याने शॉक लागून बैल बंडीवरील एक इसम व बैल ठार झाला. तर बैल बंडीवरस्वार दोन व्यक्तीही विद्युत शॉक लागल्याने जखमी झाले. ही घटना बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास वरोरा शहरानजीकच्या एकार्जुना शिवारात घडली.देवीदास कवडू बोरकुटे (५०) रा. बावणे लेआऊट वरोरा असे मृताचे नाव आहे. एकार्जुना येथील उत्तम थेरे यांच्या शेतात बुधावरी सकाळी देविदास बोरकुटे हे बैलबंडीने जात होते. बैलबंडीवर शिला थेरे व विनोद जीवतोडे बसले होते. रस्त्यावर जिवंत विद्युत तार तुटून पडली होती. सर्वप्रथम बैलाला विद्युत शॉक लागल्याने बैल तडफडू लागल्याने देवीदास बोरकुटे यांनी बैलबंडीवरुन उडी घेतली. तेव्हा देविदासच्या हाताला विद्युत तारेचा शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर एक बैलही मृत्यू पावला. याचवेळी बैलबंडीवर असलेले शिला थेरे व विनोद जीवतोडे यांनाही विजेचा सौम्य धक्का लागला. त्यामुळे ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. मृताच्या वारसांना मदत मिळत नाही तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही, अशी भूमिका जिल्हा परिषद सदस्य नितीन मत्ते, भाजपा तालुका अध्यक्ष डॉ. भगवान गायकवाड, देविदास ताजणे यांनी घेतली. त्यामुळे घटनास्थळावर तणाव निर्माण झाला. वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता विनोद भोयर यांनी आपल्या सहकाऱ्यासह घटनास्थळाला भेट देवून उपस्थितांशी चर्चा करून मृताच्या परिवारास तातडीची आर्थिक मदत दिली. मृताच्या वारसांना वीज वितरण कंपनीकडून आर्थिक मदत देण्याचे आश्वासन मिळाल्याने मृतदेह शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठविण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)