शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

चाकू हल्ल्यात एक ठार

By admin | Updated: July 17, 2016 00:32 IST

येथून जवळच असलेल्या नागापूर फाट्यावर १५ जुलै रोजी रात्री ८.१५ च्या दरम्यान पालडोह येथील ...

एक जखमी : दुचाकीस्वारांना नागापूर फाट्याजवळ अडविलेजिवती : येथून जवळच असलेल्या नागापूर फाट्यावर १५ जुलै रोजी रात्री ८.१५ च्या दरम्यान पालडोह येथील शिवाजी नामदेव गिते (३८) व विजय भाऊराव राठोड हे दोघेही दुचाकीने जिवतीकडे येत असताना फाट्यावर दडून बसलेल्या अज्ञात आरोपींनी चाकू हल्ला केला. त्यात शिवाजी नामदेव गिते याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर विजय भाऊराव राठोड जखमी झाले.शिवाजी गिते व विजय राठोड हे दोघेही पालडोह येथील रहिवासी असून शुक्रवारी रात्री ८ वाजतादरम्यान पाण्याची मोटार बिघडल्याने दोघेही दुचाकीने पालडोहवरुन जिवतीकडे मेकॅनिकला घेवून जाण्यासाठी निघाले होते. रस्त्यावरच्या नागापूर फाट्यावर आधीच दडून बसलेल्या अज्ञात दोन आरोपींनी शिवाजी गिते व विजय राठोड यांची दुचाकी अडवून त्यांच्यावर धारधार शस्त्राने सपासप वार करून शिवाजी गिते यांची हत्या केली. तर विजय राठोड यांना खांद्यावर व मांडीवर चाकूने वार केल्याने तेही जखमी झाले. जखमी अवस्थेतच विजय राठोड यांनी नागापूर गावाकडे धाव घेत नातेवाईकांना फोनने बोलावले. तोपर्यंत अज्ञात आरोपी दुचाकीने पसार झाले.या घटनेची माहिती तात्काळ जिवती पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार जिवती पोलिसांनी घटनास्थळ गाठून शिवाजी नामदेव गिते यांचा मृतदेह ताब्यात घेतला. जखमी विजय राठोड यांना उपचारासाठी गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अज्ञात आरोपीविरुद्ध जिवती पोलिसात ३०२ चा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास जिवती पोलीस ठाण्याचे ठाणेदार के.बी. शेळके व त्यांचे सहकारी करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)घटनेनंतर गावात हळहळस्वत:चे मालवाहू (पिकअ‍ॅप) वाहन चालवून गुण्यागोविंदाने संसाराचा गाडा चालविणाऱ्या शिवाजी गितेवर चाकू हल्ला करून हत्या केल्याने पालडोह व इतर नातेवाईकांत शोककळा पसरली आहे. त्यांची हत्या का केली असावी, यावर तर्कवितर्क लावले जात आहेत.पोलिसांनी कठोर होणे गरजेचेकायद्याच्या चिंधड्या उडवित सर्वसामान्य नागरिकांवर वर्दळीच्या रस्त्यावर हल्लेखोर चाकू हल्ला करून हत्या करण्यासारखे प्रकार घडवितात. हा प्रकार अतिशय गंभीर असून पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीला ठेचून काढण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे.