शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आॅटोरिक्षा अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:29 IST

येथून भरगच्च प्रवाशी भरून जात असलेला अ‍ॅटोरिक्षा पोंभुर्णा जवळील टर्निंग पॉर्इंटवर उलटल्याने एक ठार तर ११ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी ४ वाजता घडली.

ठळक मुद्दे११ जखमी : चार महिन्यांचा मुलगा बचावला

लोकमत न्यूज नेटवर्कपोंभुर्णा : येथून भरगच्च प्रवाशी भरून जात असलेला अ‍ॅटोरिक्षा पोंभुर्णा जवळील टर्निंग पॉर्इंटवर उलटल्याने एक ठार तर ११ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी ४ वाजता घडली. गंभीर जखमी असलेल्या व्यक्तीस जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला. तर ११ जखमींवर पोंभुर्णा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असून यातील पाच जखमी रुग्णांना चंद्रपूर येथे हलविण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.नथुजी आलाम (४०) जाम तुकुम असे मृत प्रवाशाचे नाव आहे. पोंभुर्णा येथे दर मंगळवारी आठवडी बाजार भरते. त्यामुळे परिसरातील अनेक नागरिक व महिला भाजीपाला खरेदीसाठी पोंभुर्णा येथे जात असतात. यामार्गे अनेक अ‍ॅटो धावत असतात. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने एका आॅटोमध्ये १५ ते १६ प्रवासी जनावरांसारखे कोंबुन नेत असतात.अशातच मंगळवारी देवाडा खुर्द- जामतुकुमकडे धावणारा एमएच ३४ डी ५८०५ या क्रमांकाचा करण सुरजागडे यांचा टर्निंग पॉर्इंटवर उलटला. या आॅटोमध्ये देवाडा खुर्द, जामखुर्द व जामतुकुम येथील १६ प्रवासी होते. अपघातात नथुजी आलाम हे गंभीर जखमी झाले. त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला.तर उज्वला अविनाश भडके, अविनाश भडके, सपना पुरुषोत्तम कोहळे, अरूनाबाई बुरांडे, उषा मानकर, हायसला कन्नाके, संस्कार पेन्दोर, इंदिरा पेन्दोर, सुमन सिडाम, भोजराज टोंगे, तुकाराम भलवे या ११ जणांवर प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभूर्णा येथे उपचार सुरू आहे. यातील ५ प्रवाशांना गंभीर दुखापत असल्याने चंद्रपूर येथे हलविण्यात येणार असल्याचे कार्यरत डॉक्टरनी सांगितले. वृत्त लिहीपर्यंत पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नव्हती.लोकप्रतिनिधींची भेटअ‍ॅटो उलटल्याने ११ प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळताच पोंभूर्णा पंचायत समितीचे उपसभापती विनोद देशमुख, पं.स. सदस्य ज्योती बुरांडे, नगरसेवक जयपाल गेडाम, तेजराज मानकर, गणेश वासलवार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभूर्णा येथे जखमींची भेट घेऊन विचारपूस केली.