लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र शासनाच्या आदेशानुसार गांधी जयंतीचे औचित्य साधून बुधवार दि. २ ऑक्टोबरपासून शहरामध्ये सिंगल युज म्हणून एकाच वापरात येणाऱ्या प्लॉस्टिकवर शंभर टक्के बंदी घातली आहे. दरम्यान, बंदीनंतर शहरामध्ये सिंगल यूज प्लॉस्टिकच्या वस्तू, पिशव्यांची विक्री अथवा वापर करताना कोणी आढळून आल्यास संबंधितांवर थेट गुन्हा दाखल करणे व प्रत्येकी ५ हजार रूपयांचा दंड करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देयात आले आहेत. याबाबत जनजागृतीे करण्यासाठी महानगरपालिकातर्फे बुधवारी शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली.आयुक्त संजय काकडे यांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आल्यानंतर शहराच्या जटपुरा, बिनबा, पठाणपुरा, अंचलेश्वर या प्रवेशद्वारापासून क्लीनथॉन -प्लॉग रन रॅलीज काढण्यात आल्या. मनपाचे प्रभाग अधिकारी व स्वच्छता निरीक्षक या रॅलीचे नेतृत्व करीत होते.रॅली दरम्यान मार्गात आढळणाºया सर्व प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करण्यात आले. सर्व रॅली गांधी चौकात एकत्र आल्यानंतर उपस्थित दीड हजार लोकांच्या जनसमुदायाला आयुक्त संजय काकडे यांच्याद्वारे स्वच्छतेची तसेच प्लास्टिक वापर न करण्याबाबत शपथ देण्यात आली. यादरम्यान जिल्हा स्टेडियमवर शालेय मुलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन व शालेय मुलांसाठी प्रबोधनपर खेळांचे आयोजन केले गेले. केंद्र शासनाने येत्या २ आॅक्टोबरपासून संपूर्ण देशात प्लॉस्टिक वापराला शंभर टक्के बंदी केली आहे.हे आहे सिंगल युज प्लास्टिकसार्वजनिक समारंभात एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॉस्टिक थर्मोकोलच्या वस्तू (ताट, कप, वाट्या, ग्लास)प्लॉस्टिक पासून बनविलेल्या पिशव्या (हँडल असलेल्या, नसलेल्या)हॉटेलमध्ये अन्नपदाथ्र पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लॉस्टिकनॉन व्होवन बॅग्जप्लॉस्टिकचे सर्व प्रकारचे पाउचगारबेज बॅग्जआदी पेये पिण्यासाठी वापरण्यात येणारे स्ट्रॉथर्माकोल, प्लॉस्टिकच्या सजावटीच्या वस्तू
‘सिंगल युज’ प्लास्टिकवर शंभर टक्के बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 06:00 IST
आयुक्त संजय काकडे यांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आल्यानंतर शहराच्या जटपुरा, बिनबा, पठाणपुरा, अंचलेश्वर या प्रवेशद्वारापासून क्लीनथॉन -प्लॉग रन रॅलीज काढण्यात आल्या. मनपाचे प्रभाग अधिकारी व स्वच्छता निरीक्षक या रॅलीचे नेतृत्व करीत होते.
‘सिंगल युज’ प्लास्टिकवर शंभर टक्के बंदी
ठळक मुद्देविक्री, वापर आढळून आल्यास गुन्हे दाखल करणार : ५ हजार रूपये दंड