: समाजकल्याण विभाग पं. स. चिमूर यांच्यावतीने शंकरपूर येथे हनुमान किल्ला मंदिर येथे अंगणवाडी कार्यकर्त्या व पर्यवेक्षिका यांची एकदिवसीय कार्यशाळा पार पडली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकरपूर ग्रामपंचायतीचे सरपंच साईश वारजूकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच अशोक चौधरी व ग्रामसेवक के. टी. गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजाता शंभरकर, पर्यवेक्षिका वाघमारे उपस्थित होते.
या कार्यशाळेत दिव्यांग प्रतिबंधात्मक माहिती व यावर उपाय व दिव्यांग्याकरिता विविध योजना यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक के. टी. गायकवाड, तर संचालन अंगणवाडी सेविका कालिंदा ढोक यांनी केले.