शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पूर्वसूचना न देता एक दिवसाआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 22:48 IST

नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता सध्या चंद्रपुराते एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. काही वॉर्डात तर दोन दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. मात्र याची नागरिकांना कल्पना नसल्याने नागरिकांना ऐनवेळी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या अनियमित पाणी पुरवठ्यामुळे चंद्रपुरातील नागरिक चांगलेच वैतागले आहेत.

ठळक मुद्देचंद्रपूरकरांचे हाल : ऐनवेळी नळ न आल्याने करावी लागते भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता सध्या चंद्रपुराते एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. काही वॉर्डात तर दोन दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. मात्र याची नागरिकांना कल्पना नसल्याने नागरिकांना ऐनवेळी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या अनियमित पाणी पुरवठ्यामुळे चंद्रपुरातील नागरिक चांगलेच वैतागले आहेत.उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे चंद्रपुरातील पाणी पुरवठ्याचे कंत्राट आहे. चंद्रपुरात नेहमीच पाणी पुरवठ्यात अनियमिता राहिली आहे. दरवर्षीच चंद्रपुरात पाण्यासाठी बोंबा मारल्या जातात. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या इरई धरणातून चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा केला जातो. मागील वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने इरई धरणात पाण्याचा साठा कमी आहे. मात्र उन्हाळ्यात हा जलसाठा चंद्रपूरकरांना पुरु शकतो. मागील वर्षी इरई धरणाची याहून बिकट स्थिती होती. तेव्हा महानगरपालिका प्रशासनाने चंद्रपुरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करावा का, यासाठी सभा घेतली होती. सर्व विचाराअंती सभेत शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यंदा थोडी स्थिती बरी आहे. तरीही मागील काही दिवसांपासून चंद्रपुरात एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. याशिवाय शहरातील तुकूम परिसर, विठ्ठल मंदिर वॉर्ड, बाबुपेठ परिसर, नगिना बाग आदी भागात तर दोन-दोन दिवस नळ येत नाही.विशेष म्हणजे, शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याबाबतचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे की कंत्राटी कंपनीने परस्पर हा निर्णय घेतला आहे, हेच नागरिकांना समजेणासे झाले आहे. मनपाने हा निर्णय घेतला असेल तर त्याची पूर्वसूचना नागरिकांना दिली नाही. त्यामुळे तयारीत नसलेल्या नागरिकांना ऐनवेळी न आल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागते.पाणी पुरवठाही कमीशहराला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणात सध्या पाणीसाठा असला तरी पाणी पुरवठा करताना तो मुबलक केला जात नाही. कुठे एक तास तर कुठे त्याहून कमी पाणी येते. त्यातही धारही मोठी नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठे हाल सहन करावे लागत आहे. काही भागात तर केवळ अर्ध्या तासातच नळाची धार गुल होते, अशाही तक्रारी आहेत.