वरोरा: १८ वर्षापूर्वी वरोरा तालुक्यातील दिंदोडा गावा नजीकच्या वर्धा नदीच्या पात्रात धरण बांधण्याकरिता जमीनी संपादीत केल्या होत्या. यामध्ये वरोरा तालुका, वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमीनाचा समावेश आहे. या प्रकल्प ग्रस्तांना वाढीव मोबदला देण्यात यावा अन्यथा जमीन परत द्या, आदी मागण्यांकरिता मंगळवारला प्रकल्पग्रस्तांनी दिंदोडा येथे ठिय्या आंदोलन केले.सन १९९९ ते २००० मध्ये झालेले अधिग्रहन रद्द करण्यात यावे, नवीन भूमी अधिनियम कायदा २०१३-२०१४ नुसार शेतजमीनांना योग्य दर देण्यात यावा, प्रकल्प बाधीत शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नौकरी देण्यात यावी, मागील १८ वर्षापासून शासनाने सातबारा रेकार्डवर संपादीत जमिनीची नोंद त्वरीत रद्द करण्यात यावी, प्रकल्पापासून बाधीत होणाऱ्या संपूर्ण गावात मुलभूत सोई पुरविण्यात याव्यात, जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत प्रकल्पाचे काम सुरु करण्यात येऊ नये, आदी मागण्या घेवून मंगळवारला प्रकल्पग्रस्तानी एक दिवसीय ठिय्या आंदोलन केले. यावेळी पुंडलिक तिजारे, अभिजीत भांडेकर, चंपत साळवे, डॉ. विजय देवतळे, प्रकाश मुथा, डॉ. मनोज तेलंग, पिंटू केसरकर, निशीकांत ठाकरे, राजू भोयर, मिलिंद भोयर, संजय परसुटकर, रामदास ठोंबरे, देवराव सपाट, रामप्रभु सरदार, पराग इंगोले, आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी वरोरा, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थितीत होते. (तालुका प्रतिनिधी)
दिंदोडा प्रकल्पग्रस्तांचे एक दिवसीय ठिय्या आंदोलन
By admin | Updated: March 22, 2017 00:52 IST