शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वरोरा पंचायत समितीसाठी एक कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 22:25 IST

राज्याचे अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने वरोरा पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या फर्निचर व अंतर्गत सुविधेच्या कामांसाठी एक कोटी रूपये किमतीच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्याचे अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने वरोरा पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या फर्निचर व अंतर्गत सुविधेच्या कामांसाठी एक कोटी रूपये किमतीच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. शासनाच्या ग्रामविकास विभागाने याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वरोरा येथील नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे.वरोरा पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास येवून सदर इमारतीत पंचायत समितीचे कामकाज कार्यान्वित करण्यात आले आहे. वरोरा पंचायत समितीच्या नविन प्रशासकीय इमारत बांधकामाच्या मुळ प्रस्तावास मॉडयुल फर्निचर व अंतर्गत सुविधा तसेच परिसर विकास या बाबींचा समावेश केलेला नसल्यामुळे पंचायत समिती प्रशासनाने याबाबत मागणी केली. वरोरा येथे झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर ही मागणी मांडण्यात आली. त्यांनी सदर सुविधांसाठी तातडीने निधी उपलब्ध करण्याचे आश्वासन जाहीरपणे दिले होते. त्यांनी दिलेल्या निदेर्शांच्या अनुषंगाने शासनाला याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला.त्यानुसार वरोरा पंचायत समितीच्या नविन प्रशासकीय इमारतीच्या फर्निचर व अंतर्गत सुविधांच्या कामासाठी एक कोटी रू. निधीच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. वरोरा नगर परिषद क्षेत्रातसुध्दा अर्थमंत्र्यांच्या पुढाकाराने निधी मंजूर करण्यात आला असून अनेक विकासकामांचे लोकार्पण व भूमीपूजनसुध्दा करण्यात आले आहे.