शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

लेखणीबंदमुळे मुद्राकांचा एक कोटींचा महसूल बुडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 05:00 IST

चंद्रपूर शहरात दुय्यम निबंधकाचे दोन, सहजिल्हा निबंधक कार्यालय तसेच जिल्ह्यात १४ असे एकूण १७ कार्यालय आहेत. या कार्यालयात शेतीव जमिन खरेदी विक्री, गहाणखते, दस्त नोंदणी, मालमत्तेची नोंदणी आदी कामे केली जात असतात. त्यातून दिवसापोटी १ कोटी रुपयांचा महसुल शासनाला मिळत असतो. मात्र बुधवारपासून राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन सुरु केले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील १७ कार्यालयातील काम ठप्प : कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून बेमुदत आंदोलन सुरु केले आहे. यामुळे जिल्ह्याती सर्व १७ कार्यालयातील खरेदी विक्रीचे व नोंदणीच्या कामांद्वारे मिळणारा एक दिवसांचा सुमारे एक कोटीं रुपयांचा महसूल बुडाला असल्याचा अंदाज कर्मच्यांकडून व्यक्त होत आहे. तर काम बंद असल्याने नागगरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.चंद्रपूर शहरात दुय्यम निबंधकाचे दोन, सहजिल्हा निबंधक कार्यालय तसेच जिल्ह्यात १४ असे एकूण १७ कार्यालय आहेत. या कार्यालयात शेतीव जमिन खरेदी विक्री, गहाणखते, दस्त नोंदणी, मालमत्तेची नोंदणी आदी कामे केली जात असतात. त्यातून दिवसापोटी १ कोटी रुपयांचा महसुल शासनाला मिळत असतो. मात्र बुधवारपासून राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे सर्व कामकाज ठप्प पडले असल्याने शासनाचे मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. तर कामाकाजासाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना आल्या पावली परत जावे लागत आहे. या आंदोलनात नोंदणी व मुद्राक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बी. एन. माहोरे, सचिव व्ही. एम. एम. बोरकर, उपाध्यक्ष पी. पी. चिडे, आशिष राठोड, भारवी जिवणे यासह जिल्ह्यातील सर्व कर्मचारी सहभागी झाले होते.या आहेत मागण्याकर्मचाऱ्यांना तात्काळ पदोन्नती देण्यात यावी, रिक्त पदे भरण्यात यावी, कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कर्मचाºयांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत देण्यात यावी तसेच अनुकंपा तत्वावर एकाला नोकरी द्यावी, सर्व कर्मचाऱ्यांना ५० लाखांची विमा सुरक्षा द्यावी, तुकडेबंदी व रेरा कायद्याद्वारे करण्यात आलेली कारवाइ मागे घ्यावी, यासह विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन करण्यात येत आहे.कार्यालयात अनेक पदे रिक्त असल्याने कर्मचाऱ्यांवर मोठा ताण पडत आहे. यासह अन्य मागण्या प्रलंबित आहेत. मात्र त्याची शासनाकडून दखल घेण्यात येत नसल्याने आंदोलन करण्यात येत आहे.- बी. एन. माहोर, जिल्हाध्यक्षनोंदणी व मुद्राक विभाग कर्मचारी संघटना, चंद्रपूर

टॅग्स :Strikeसंप