शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटीची नळयोजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:34 IST

एक कोटी रुपये खर्चून नळयोजना उभारण्यात आली. मात्र, वर्धा नदी पात्रात पाणीच नसल्याने शहरातील विविध वॉर्डांत जलसंकट निर्माण झाले आहे. दोन दिवसांपासून शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांना संकटांचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देवर्धा नदीचे पात्र कोरडे : शहरातील विविध वॉर्डांमध्ये जलसंकट

बी. यू. बोर्डेवार ।लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : एक कोटी रुपये खर्चून नळयोजना उभारण्यात आली. मात्र, वर्धा नदी पात्रात पाणीच नसल्याने शहरातील विविध वॉर्डांत जलसंकट निर्माण झाले आहे. दोन दिवसांपासून शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांना संकटांचा सामना करावा लागत आहे.शहरात ३ हजार नळधारक आहेत. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पाणी पुरवठ्यासाठी नळयोजना सुरू करण्यात आली. पण, पाणीच मिळत नसल्यामुळे भर उन्हाळ्यात शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. गुरुवारी सोमनाथपूर, नेहरु चौक वॉर्डासह अन्य काही वॉर्डांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला़ राजुरा शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन वर्धा नदीच्या पात्रात सोडून त्याद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता. परंतु नदीचे पाणी आटल्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणारी यंत्रणा कोलमडली आहे. शहराला लागून असलेले निजामकालीन तलावसुद्धा आटत आहे. पाणीच मिळत नसल्याने थंड पाण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. शुद्ध पाण्याच्या नावाखाली व्यवसाय करणाऱ्यांनी धुमाकूळ सुरू केला आहे. विंधन विहिरीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला जात आहे. नगर परिषदेने दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून पर्यायी स्त्रोत तयार केले नाहीत. वर्धा नदीच्या भरोशावरच असल्याने ही समस्या निर्माण झाली. वाढती गरज लक्षात घेऊन न. प. ने. नियोजन केल्याशिवाय समस्या सुटणार नाही.