शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

चंद्रपूर परिमंडळातील दीड लाख वीज ग्राहकांनी भरले ३६ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 05:00 IST

एप्रिल व मे मध्ये रिडींग बंद झाल्याने राज्यातील लघुदाब ग्राहकांना एप्रिल व मे महिन्याचे वीज बिल डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी या तीन महिन्यांच्या सरासरी वीज वापरामुळे देण्यात आले. एप्रिल व मे महिन्यात उन्हाळा असल्याने ग्राहकांचा वीज वापर नेहमीपेक्षा जास्त असतो. परंतु यावेळी लॉकडाऊन असल्याने सर्वजण घरी होते. परिणामी टीव्ही, पंखा, एअर कंडीशन, फ्रीझ, लॅपटॉप, संगणकाचा वापर वाढला होता.

ठळक मुद्देग्राहकांचा गैरसमज दूर : महावितरणकडून तीन महिन्यांचा स्लॅब बेनिफिट

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लॉकडाऊन काळात महावितरणने सरासरी आकारणी करून देयके पाठविल्याने काही ग्राहकांमध्ये नाराजी पसरली. याच प्रश्नावरून जिल्ह्यातील राजकीय व विविध संघटनांकडून निवेदने देवून देयक कमी करण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमी चंद्रपूर परिमंडळातील एक लाख ४० हजार ग्राहकांनी १ ते ९ जुलैपर्यंत ३६ कोटी ४८ लाखांचे वीज बिल भरले. विशेष म्हणजे विविध राजकीय पक्षांकडून वीज बील माफ करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दररोज निवेदन देणे सुरू असताना जिल्ह्यातील ८६ हजार ६२ ग्राहकांकडून २६ कोटी १८ लाखांचा वीज बील भरणा केला आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना ग्राहकांनीच चपराक दिल्याचे मानले जात आहे.महावितरणाचे चंद्रपूर परिमंडळात २ लाख ७ हजार ग्राहक आहेत. लॉकडाऊननंतर जून महिन्यात प्रत्यक्ष मीटर रिडींग घेतल्यानंतर दिलेले वीज बील अचूक असल्याबाबत ऊर्जा मंत्र्यांच्या निर्देशानुसार महावितरणच्या सर्व परिमंडळातील ग्राहकांशी संवाद साधून वीज बिलाची माहिती दिली. राज्यात २३ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर राज्य विद्युत नियामक आयोगाने या काळात महावितरणसह, राज्यातील सर्व वीज वितरण कंपनींना कोरोना संसर्ग वाढू नये, म्हणून मीटर रिडींग न घेता सरासरी रिडींगप्रमाणे ग्राहकांना वीज बिल देण्याबाबत निर्देश दिले होते. एप्रिल व मे मध्ये रिडींग बंद झाल्याने राज्यातील लघुदाब ग्राहकांना एप्रिल व मे महिन्याचे वीज बिल डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी या तीन महिन्यांच्या सरासरी वीज वापरामुळे देण्यात आले. एप्रिल व मे महिन्यात उन्हाळा असल्याने ग्राहकांचा वीज वापर नेहमीपेक्षा जास्त असतो. परंतु यावेळी लॉकडाऊन असल्याने सर्वजण घरी होते. परिणामी टीव्ही, पंखा, एअर कंडीशन, फ्रीझ, लॅपटॉप, संगणकाचा वापर वाढला होता. जून महिन्यात लॉकडाऊन शिथिल होताच प्रत्यक्ष मीटर रिडींग जूनमध्ये घेण्यात आले. त्यावेळी एप्रिल व मे महिन्याचे एकत्रित रिडींगची नोंद झाली. त्यानुसार सरासरी प्रमाणे दिलेले वीज बिल रिडींग वजा करून राहिलेले बिल देण्यात आले.शिवाय तीन महिन्यांचा स्लॅब बेनिफीटही ग्राहकांना देण्यात आला आहे. काही ग्राहकांनी एप्रिल व मे महिन्याचे सरासरी वीज बिल ऑनलाईन भरले. परंतु काहींनी एप्रिल व मे महिन्यांचे वीज बील कॅश कलेक्शन सेंटर बंद असल्याने भरले नव्हते. त्यामुळे संबंधित ग्राहकांना जूनमध्ये वीज बिलाची थकबाकीची रक्कम जोडून आल्याने वीज बिलाचा आकडा अधिक दिसून आल्याचे महावितरण चंद्रपूर परिमंडळकडून सांगण्यात आले.तीन महिन्यांचा स्लॅब बेनिफीटही ग्राहकांना देण्यात आला आहे. काही ग्राहकांनी एप्रिल व मे महिन्याचे सरासरी वीज बिल ऑनलाईन भरले. परंतु काहींनी वीज बील लॉकडाऊनमुळे भरले नव्हते. सरासरी वीज बील संदर्भात तक्रारी आल्यास निरसन केले जात आहे. यासाठी विशेष कक्ष तयार करण्यासोबतच ऑनलाईन वेबिनार सुरू आहे. त्यामुळे बील भरणाऱ्यांची संख्या वाढली. पाठविलेले बील योग्य असल्याने ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.- सुनील देशपांडे, कार्यकारी अभियंता,महावितरण परिमंडळ, चंद्रपूर

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण