शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध महिला घरकुलपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 01:42 IST

देवाडा खुर्द येथे दोन वर्षांपूर्वी संततधार पावसामुळे घराची पडझळ झाली़ अल्पभूधारक, विधवा, निराधार महिला सुमन गद्देकार यांचे घरच कोसळले. त्यामुळे मोडकीतोडकी झोपडी उभारून दिवस काढत आहेत़ मात्र, इंदिरा योजनेसाठी पात्र मागील तीन वर्षांपासून .....

ठळक मुद्देदेवाडा खुर्द येथे दोन वर्षांपूर्वी संततधार पावसामुळे घराची पडझळ झाली़

लोकमत न्यूज नेटवर्कपोंभुर्णा : देवाडा खुर्द येथे दोन वर्षांपूर्वी संततधार पावसामुळे घराची पडझळ झाली़ अल्पभूधारक, विधवा, निराधार महिला सुमन गद्देकार यांचे घरच कोसळले. त्यामुळे मोडकीतोडकी झोपडी उभारून दिवस काढत आहेत़ मात्र, इंदिरा योजनेसाठी पात्र मागील तीन वर्षांपासून अन्याय सहन करावा लागत आहे़ संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी करून घरकुल मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे़सुमनबाई गद्देकार स्थानिक वॉर्ड क्र. २ मध्ये वास्तव्यास आहेत़ त्यांना अपत्य नाही़ पतीच्या निधनानंतर विविध कामे करून पोटाची खडगी भरतात. आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. मोलमजुरी करुन कसेबसे आपले जीवन जगत असतांना २०१४ मध्ये मुसळधार पाऊस आल्याने त्यांचे घर कोसळले़ परिणामी, बेघर व्हावे लागले़ शेजारी राहणाऱ्या घुघुस्कार कुटुंबियांकडे काही दिवस राहावे लागले़ घर पडल्याने शासनाकडून भरपाई मिळावी, यासाठी ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजविले़ मात्र, तहसील कार्यालयाकडून त्यांना केवळ १ हजार ९०० रुपयाची तुटपूंजी मदत देण्यात आली़ त्या अल्पभूधारक असून ६८ व्या वर्षीही मोलमजुरी करुन जगावे लागत आहे. परिस्थिती बघून काही नागरिकांनी पडक्या घराच्या बाजूलाच छोटीशी चंद्रमोळी झोपडी बांधून दिली़ निराधार योजनेअंतर्गत मिळणाऱ्या ६०० रुपयांवर उदरनिर्वाह करीत आहे़