शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धाश्रमवासीयांनी केली ताडोबा सफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 23:16 IST

वाघांचा मुक्त संचार असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सहलीला जाणाऱ्या पर्यटकांना वाघ निश्चित दिसणार अशी अपेक्षा असते. पण, अनेकदा ती पूर्ण होत नाही. निराश होवून परत जावे लागते.

वसंत खेडेकर ।आॅनलाईन लोकमतबल्लारपूर : वाघांचा मुक्त संचार असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सहलीला जाणाऱ्या पर्यटकांना वाघ निश्चित दिसणार अशी अपेक्षा असते. पण, अनेकदा ती पूर्ण होत नाही. निराश होवून परत जावे लागते. शेवटी, वाघ ठरला जंगलाचा राजा. दर्शन देणे न देणे ही त्याची मर्जी. पण, विसापूर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना वाघाचे सहजतेने दर्शन घेण्याची संधी मिळाली. वृद्धाश्रमातील ३५ ज्येष्ठ नागरिकांचा आनंद गगणात मावेनासा झाला. या सहलीचे आयोजन पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांनी केले होते.ठाणेदार शिरस्कर व त्यांच्या पत्नी मीनाक्षी शिरस्कर ह वृद्धाश्रमातील वृद्धांची आस्थेने विचारपूस करण्याकरिता नेहमी भेट देत असतात. ताडोबा प्रकल्पात जावून वाघ बघायचा आहे, अशी इच्छा वृद्धांनी त्यांच्याकडे व्यक्त केली. दरम्यान, दोन बसगाड्यांची व्यवस्था करून ३५ महिला व पुरुषांना ताडोबा भ्रमणाकरिता नेण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक मेघा गोखरे, नायक शिपाई लोकेश नायडू, सुभाष सिडाम व पोर्णिमा महेशकर यांनाही सोबत पाठविले. नागरिकांसोबत स्वत:ही ताडोबा प्रवेश द्वारापर्यंत गेले. दोन्ही गाड्या जंगलात भ्रमंतीवर असताना छोटी तारा नावाची वाघीन गाडीपुढे येऊन उभी झाली. ज्येष्ठांनी ही वाघिण अगदी जवळून बघता आले.ठाणेदाराचा उपक्रमविसापुरातील मातोश्री वृद्वाश्रम जंगलाला लागून आहे. जंगलात बिबट्याचा वावर असतो. बिटाने आतापर्यंत अनेक जनावरे फस्त केली आहे. मात्र, वृद्धांना हा बिबट अजून दिसला नाही. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघ दोन फुट अंतरावरुन बघण्याची संधी मिळाली. ठाणेदार शिरस्कर यांनी यापूर्वी वृद्धांसाठी आनंदवन, सोमनाथ या ठिकाणची सफर घडवून आणली होती. एकाकी जीवन जगणाºया वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसाठी आयोजित केलेला हा उपक्रम प्रेरणादायी ठरला आहे.