शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेने साकारली जुन्या कपड्यांची बँक

By admin | Updated: October 26, 2016 00:58 IST

आजही बऱ्याच गरीब कुटूंबातील महिला, पुरुष, लहान मुले, म्हातारी माणसे अठराविश्वे दारिद्र्यात असून अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या मुलभूत सुविधांपासून वंचीत आहे.

सीईओंचा पुढाकार : गोरगरीब जनतेला कपडे वाटप करणारचंद्रपूर : आजही बऱ्याच गरीब कुटूंबातील महिला, पुरुष, लहान मुले, म्हातारी माणसे अठराविश्वे दारिद्र्यात असून अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या मुलभूत सुविधांपासून वंचीत आहे. अशा गरीब कुटूंबांना किमान शरीर निटनेटके दिसावे, त्यांना कपडे मिळावे यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.डी. सिंह यांच्या संकल्पनेतून जुन्या कपडयाची बँक जिल्हा बँकेने तयार केली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती या कार्यालया अंतर्गत येणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या घरातील छोट्या मुलांचे कपडे, महिला -पुरुष यांचे परिधान करण्यायोग्य कपडे गोळा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमाची सुरूवात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वत: घरचे कपडे आणून या बँकेत जमा करून केले. याला जिल्हा परिषदेमधील कर्मचाऱ्यांनी सुध्दा चांगला प्रतिसाद दिला असून पहिल्याच दिवशी भरपूर प्रमाणात चांगल्या दर्जाचे वस्त्र गोळा झाली आहेत. गोळा झालेल्या कपड्यांचे चंद्रपूरातील स्वामीकृपा बहुउद्देशिय संस्था यांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेच्या आवारात २७ आॅक्टोंबरपासून कपडे वितरणाचे स्टॉल लावण्यात येणार आहे. या स्टॉलवरुन गोरगरीब गरजुंना कपडे वितरीत करण्याचे जनकार्य केल्या जाणार आहे. या जनकार्यात सहकार्य करण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्हा परिषदेने राबविलेल्या जुन्या कपड्याच्या बँकेला भेट देवून जास्तीत जास्त परिधान करण्यायोग्य कपडे जमा करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. डी. सिंह यांनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)