शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

जुन्यांचा पत्ता नाही, नव्यांची लागवड

By admin | Updated: August 28, 2015 01:19 IST

ग्लोबल वार्मिंगसारख्या समस्यांवर मात करण्यासाठी शासनाने शतकोटी वृक्ष लागवड योजना राबवली.

वृक्ष लागवड योजना : ग्रामपंचायतींचा केवळ देखावाचंद्रपूर : ग्लोबल वार्मिंगसारख्या समस्यांवर मात करण्यासाठी शासनाने शतकोटी वृक्ष लागवड योजना राबवली. मात्र, या योजनेचा गतवर्षी जिल्ह्यात पुरता फज्जा उडाला. अनेक ग्रामपंचायतीनी वृक्ष लागवड न करताच निधीची उचल केली. एकाही ग्रामपंचायतीकडे जगलेल्या वृक्षांचा आकडा उपलब्ध नाही. ग्रामपंचायतींची चौकशी झाली. मात्र त्याचाही फायदा झाला नाही. आता पून्हा नव्याने वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. शासनाच्या महत्वाकांक्षी शतकोटी वृक्षलागवड योजनेर्तंगत दरवर्षी प्रत्येक जिल्ह्याला वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट दिले जाते. या उद्दीष्टानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीला वृक्ष लागवड करायची असते. मात्र केवळ शासनाचे अनुदान लाटण्यासाठी अनेक ग्रामपंचायतीनी या योजनेचा मार्ग अवलंबिला आहे. उद्दीष्टानुसार ग्रामपंचायत प्रशासनाकडून रोजगार हमी योजना, १३ वा वित्त आयोग, पर्यावरण संतुलीत, ग्रामनिधीच्या माध्यमातून वृक्ष लागवड केली जाते. दरवर्षी खड्डे खोदून वृक्ष लागवड होत असली तरी जगलेल्या वृक्षांचा पत्ता नाही. शतकोटी वृक्ष लागवड योजने अंतर्गत सन २०१४-१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याला १४ लाख ६४ हजार ९६५ वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले. यापैकी ३० जानेवारी २०१५ पर्यंत ४८९ ग्रामपंचायतींमार्फंत ५ लाख २३ हजार ७४१ वृक्ष लावल्याची प्रशासनाकडे नोंद आहे. यासाठी ७ लाख ६३ हजार ५४ खड्डे खोदल्याचीही नोंद आहे. ही प्रक्रिया सुरुच असली तरी जगलेल्या झाडांचा मात्र पत्ता नाही, अशी स्थिती आहे. मात्र, ग्रामपंचायत प्रशासन आपण वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट पूर्ण केल्याचे दाखवून शासकीय निधीची उचल करीत आहे. चालू वर्षात जिल्ह्याला वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट अद्याप मिळालेले नाही. मात्र पावसाळा सुरू होताच वृक्ष लागवडीला प्रारंभ होत असते. ज्या ठिकाणी वृक्ष करपली, त्या ठिकाणी नव्याने वृक्ष लागवड केली जात असल्याचे रोहयोच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)