शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

तेलाची फोडणी महागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:26 IST

चंद्रपूर : मागील आठवडाभरापासून तेलाच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ होत आहे. सोयाबीन-पाम तेल प्रति लीटर १० ते १५ रुपयांची वाढ ...

चंद्रपूर : मागील आठवडाभरापासून तेलाच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ होत आहे. सोयाबीन-पाम तेल प्रति लीटर १० ते १५ रुपयांची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारपेठेत तेलाचे दर १३५ रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे गृहिणींना तेलाची फोडणी जरा जपूनच वापरावी लागणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे दर स्थिर असतानासुद्धा तेलाचे दर वाढत असल्याने जनसामान्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढल्याने जनसामान्यांकडून ओरड होत असतानाच मागील आठवडाभरापासून तेलाच्या किमती वाढत आहेत. पूर्वी कोरोनामुळे अनेकांची नोकरी गेली. अनेकांचा व्यवसाय डबघाईस आल्याने ओढाताण करून जीवन कंठीत आहेत. त्यातच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ केल्याने महिलांना स्वयंपाकाची घडी बसविण्यासाठी मोठी अडचण जात आहे. आठवडभरापूर्वी सोयाबीन तेल किरकोळ बाजारपेठेत १२० रुपये होते. मात्र आता त्यामध्ये १५ रुपयांची वाढ झाल्याने १३५ रुपयांवर पोहोचले आहे. तर पामतेल १२५ रुपये प्रति लीटर, आरबी १२५ रुपये, फल्ली तेल १६०, सूर्यफूल १६५ रुपये प्रति किलो विक्री केले जात आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

बॉक्स

साखर स्थिर तर डाळीमध्ये चार ते पाच रुपयांची वाढ

मागील महिनाभरापासून साखरेचे दर ३६ रुपये किलो स्थिर आहेत. तर डाळीच्या दरामध्ये चार ते पाच रुपयांनी वाढ झाली आहे. सद्य:स्थितीत तूरडाळ शंभर ते ११० रुपये किलो, चणाडाळ ७० ते ८० रुपये, मसूर ७० ते ८०, मूंगमोगर १०० ते ११०, मूगडाळ १०० ते ११० रुपये प्रतिकलोने विक्री होत आहे. त्यामुळे दररोजच्या जेवणातील वरण बनवणे कठीण झाले आहे.