शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पासपोर्ट सेवा केंद्रासाठी आज अधिकाऱ्यांची चमू चंद्रपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 23:09 IST

केंद्रिय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या विशेष प्रयत्नातून चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी चंद्रपूर महानगरातील भारतीय टपाल विभागाद्वारे पारपत्रा (पासपोर्ट) सेवा केंद्राची सुविधा उपलब्ध होणार असून केंद्र सरकारने या सेवेकरिता नुकतीच हिरवी झेंडी दाखविली आहे.

ठळक मुद्देनागरिक आनंदात : हंसराज अहीर यांच्या प्रयत्नांची फलश्रुती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्रिय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या विशेष प्रयत्नातून चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी चंद्रपूर महानगरातील भारतीय टपाल विभागाद्वारे पारपत्रा (पासपोर्ट) सेवा केंद्राची सुविधा उपलब्ध होणार असून केंद्र सरकारने या सेवेकरिता नुकतीच हिरवी झेंडी दाखविली आहे. चंद्रपूर महानगरात या सेवा केंद्राची सुरूवात करण्याच्या दृष्टीने नागपूर येथील पासपोर्ट सेवा केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चमू २५ मे रोजी चंद्रपुरात दाखल होत आहे.या भेटीमध्ये ही चमू डाक विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी सेवा केंद्राच्या उभारणी संदर्भात चर्चा करून आवश्यक माहिती घेणार आहेत. नागपूर पासपोर्ट सेवा केंद्राचे प्रादेशिक पारपत्रा अधिकारी सी.एल. गौतम व त्यांचे सहकारी अधिकारी कुमार यांच्या नेतृत्वामध्ये ही चमू चंद्रपूर येथे येत आहे. चंद्रपूर हे महानगराचे स्थान असल्याने या शहरात पासपोर्ट सेवा केंद्र कार्यान्वित व्हावे, अशी भूमिका घेत केंद्रिय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केंद्रिय विदेश मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी चर्चा केली होती.सदर चर्चा सकारात्मक झाल्याने व विदेश मंत्रालयाने तिसऱ्या टप्प्यात चंद्रपुरातील पारपत्रा सेवा केंद्रास मान्यता प्रदान केल्याने हे केंद्र यथावकाश सुरू करण्यासाठी शासकीय स्तरावरून कार्यवाहीस सुरूवात झाली असल्याचे संकेत या चमुच्या दौºयामधून मिळत आहेत.चंद्रपूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नागरिक, उच्च शिक्षणासाठी विदेशात जावू इच्छिणारे विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांसाठी मोठ्या प्रतीक्षेनंतर पारपत्राची सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्याचे स्वप्न केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या लोकाभिमुख कार्यामुळे साकार होणार आहे.चंद्रपुरातील या पारपत्रा सेवा केंद्राचे कार्यान्वय शीघ्रगतीने व्हावे, यासाठी ना. हंसराज अहीर प्रयत्नशील आहेत.