शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

हे गणराया, ब्रह्मपुरी जिल्ह्यासाठी सद्बुद्धी दे !

By admin | Updated: September 6, 2016 00:42 IST

हे गणराया, तुझ्या आगमनाची ब्रह्मपुरीकर व पंचक्रोशितील भक्तगत दरवर्षी वाट पाहात असतात.

९ सप्टेंबरला धरणे आंदोलन : सार्वजनिक गणेश उत्सवासोबत घरगुती उत्सवाचे मोठे रुपब्रह्मपुरी : हे गणराया, तुझ्या आगमनाची ब्रह्मपुरीकर व पंचक्रोशितील भक्तगत दरवर्षी वाट पाहात असतात. कारण ब्रह्मपुरीच तुझ्या उत्सवाने सर्वदूर परिचित झाली आहे. गणपती उत्सव म्हणजेच खऱ्या अर्थाने ब्रह्मपुरीकरांचा उत्सव असल्याचे दरवर्षी वाटत आले आहे. पण एक खंत मात्र आहे आणि ती पूर्ण करण्याचे वचन यावेळी ब्रह्मपुरीकरांना द्यावयाचे आहे, तो म्हणजे ‘ ब्रह्मपुरी जिल्हा झालच पाहिजे’, यासाठी शासनाला सद्बुद्धी दे! अशी प्रार्थना तुझ्या आमनाच्या निमित्याने ब्रह्मपुरीकर करीत आहेत. ९ सप्टेंबरला धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.ब्रह्मपुरीचा एकमेव मोठा उत्सव म्हणजे गणपती जत्रा होय. वीज वितरण कंपनी, एसटी महामंडळ, तुमाने कंपनी, स्व. डॉ. दौलतराव आकरे आदींनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात करून ब्रह्मपुरीला सांस्कृतिकदृष्टया नावारुपास आणले. त्यानंतर माजी आमदार स्व. बाबासाहेब खानोरकर यांनी पुन्हा ब्रह्मपुरीत गणपती उत्सवात भर घालून खेड्यापाड्यातून बंडीबैल व ट्रॅक्टरने उत्सवात भाविक गर्दी करीत आहेत. त्यांची अखंडित परंपरा त्यांची मुलगी नगरपरिषदेच्या उपाध्यक्षा रश्मी पेशने, मुलगा तरंग व पंकज चालवत आहेत. तर दुसरीकडे पूर्ण विदर्भातील ख्यातनाम शिक्षण संस्था नावलौकिक मिळविलेल्या नेवजाबाई हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव अशोक भैया यांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात करून ब्रह्मपुरीच्या उत्सवात पुन्हा भर टाकली आणि पुन्हा ब्रह्मपुरी उत्सवाचे नवीन पर्व सुरू झाले. या दोन्ही सार्वजनिक उत्सवासहीत शहराते पेठवार्ड, पटेलनर, धुम्मनखेडा, टिळकनगर, कुर्झा, बोेंडगाव, गांधीनगर, हनुमाननगर, देलनवाडी आदी भागात गणपती उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासोबतच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेश उत्सवालादेखील मोठे स्वरुप प्राप्त झाले आहे. याबरोबरच घरगुती गणेश उत्सवालाही मोठ्या प्रमाणात उत्सवाची तयारी दिसून येत आहे.कुंभर बांधवाकडे मूर्तीच्या आगमनाकडे रिघ लागल्याचे दिसून येत आहे. यासर्व पार्श्वभूमीवर यावर्षी ब्रह्मपुरी जिल्ह्याचा प्रश्न सातत्याने सर्वासमोर उभा आहे. सन १९९२ पासूनची मागणी आहे. राष्ट्रसंत गिताचार्य तुकडोजी महाराज यांच्या पावनस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. अड्याळ टेकडी हे पवित्र स्थान ब्रह्मपुरीच्या संस्कृतीचा मानबंदू आहे. गीताचार्य स्व. तुकाराम दादा यांचे हजारो अनुयायी तालुक्यात शांतीचा व अहिंसेचा प्रचार व प्रसार करीत आहेत. तरीही शासनदरबारी ब्रह्मपुरी जिल्ह्याची नोंद का केली जात नाही, हे गणराया तूच समजून घेण्याची वेळ आली आहे. गणराया तुझ्या आगमनात व विसर्जनात कुठलीही कसर ब्रह्मपुरीकरांनी ठेवली नाही. तुझ्यावर जिवापाड प्रेम केलेले पुरुष, महिला व युवक आणि बाल नतमस्तक होत आहे. पण आता मात्र या सर्वांना तुझ्या कडून मोठी आशा आहे. तूच आपल्या वक्रतूंड, महाकाय, सुर्यकोटी वरहस्ताने आमच्या ब्रह्मपुरी जिल्हा बनविण्यासाठी शासनाला सद्बुद्धी दे ! व आमच्या गेल्या ३५ वर्षांपासून होत असलेला अन्याय दूर कर, हीच या ब्रह्मपुरीमधील विद्यार्थी, युवक, महिला, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी व सर्वांची मनोमनी मागणी आहे. याबरोबरच माझ्या शेतकऱ्याला बळ दे ! त्याच्या शेतात पावसाच्या धारा व धानाचा मोती चमूक दे, हीसुद्धा समस्त बळीराजांची अपेक्षा! (तालुका प्रतिनिधी)