शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

बाधितांची संख्या झपाट्याने घटतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर :  जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. शुक्रवारी १७५ जणांनी कोरोनावर मात केल्याने ...

ठळक मुद्देकोरोना संपला नाही; बाजारात गर्दी करू नका- जिल्हाधिकारी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर :  जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. शुक्रवारी १७५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आता अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या केवळ दोन हजार ३६७ वर आली आहे. दरम्यान, नागरिकांनी बाजारात गर्दी करू नये. मास्क लावणे, हात धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा अवलंब करून कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.शुक्रवारी १०६ जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १७ हजार ४८४ वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १४ हजार ८५० झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख २९ हजार ६०७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख दहा हजार ७०० नमुने निगेटिव्ह आले आहे.शुक्रवारी चंद्रपूर शहर व परिसरातील जल नगर वार्ड, तुकुम, पायली भटाळी, बाबुपेठ, ऊर्जानगर, घुग्घुस, सिव्हील लाईन परिसर, जटपुरा वार्ड, दुर्गापूर, शक्तिनगर, बालाजी वार्ड, उत्तम नगर, रामनगर, घुटकाळा वार्ड, सरकार नगर, निर्माण नगर, नगिना बाग, स्वावलंबी नगर, बंगाली कॅम्प परिसर, पडोली, समाधी वार्ड भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधितचिमूर तालुक्यातील राजीव गांधी वार्ड, वडाळा भागातून बाधित पुढे आले आहे. मूल तालुक्यातील चक दूगाळा, कन्नमवार वार्ड, वार्ड नंबर ८ परिसरातून बाधित ठरले आहे. सावली तालुक्यातील कापसी भागातून बाधित ठरले आहे. कोरपना तालुक्यातील बिबी, गडचांदूर, वैशाली नगर, वनसडी, कन्हाळगाव, भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. वरोरा तालुक्यातील पाझूंर्णी, अभ्यंकर वार्ड, शांतीनगर, सरदार पटेल वार्ड, मालवीय वार्ड, टेमुर्डा, शेगाव भागातून बाधित पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील कपिल वास्तू नगर, देलनवाडी परिसरातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील गुरु नगर, आॅर्डनन्स फॅक्टरी चंदा परिसर, आंबेडकर वार्ड, किल्ला वार्ड, घोडपेठ, भंगाराम वार्ड, विजासन रोड परिसर, पंचशील नगर, सुरक्षा नगर, झाडे प्लॉट परिसर, समता नगर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. राजुरा तालुक्यातील नगर परिषद वॉर्ड, देशपांडे वाडी, आंबेडकर वार्ड, आदर्श चौक परिसर, निंबाळा भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

सात बाधितांचा मृत्यूशुक्रवारी सात कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. या बाधितामध्ये नागाडा, चिचपल्ली येथील ४० वर्षीय पुरुष, चिचपल्ली येथील ५८ वर्षीय महिला, लालपेठ कॉलनी येथील ५३ वर्षीय पुरुष, पद्मापूर येथील ८१ वर्षीय पुरुष, सिंदेवाही तालुक्यातील गोविंदपूर येथील ६५वर्षीय पुरुष, घुगुस येथील ४६ वर्षीय पुरुष, तर गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २६७ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २५० बाधितांचा समावेश आहे.

तालुकानिहाय नवे बाधितजिल्ह्यात शुक्रवारी पुढे आलेल्या १०६ बाधितांमध्ये ६७ पुरुष व ३९ महिला आहेत. यात चंद्रपूर शहर व परिसरातील ४०, बल्लारपूर तालुक्यातील एक, चिमूर तालुक्यातील एक, मूल तालुक्यातील आठ, गोंडपिपरी तालुक्यातील चार, कोरपना तालुक्यातील आठ, ब्रह्मपुरी तालुक्यातील चार, वरोरा तालुक्यातील आठ, भद्रावती तालुक्यातील २१, सावली तालुक्यातील एक, सिंदेवाही तालुक्यातील चार, राजुरा तालुक्यातील सहा बाधितांचा समावेश आहे.