शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरात लसीकरण केंद्रांची संख्या वाढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 05:00 IST

लसीकरण मोहीमेसाठी को-विन नावाचा प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला. हा प्लॅटफॉर्म लसीकरण मोहीम राबवणारी यंत्रणा, लस देणारी आरोग्य सेवा व लस घेणाºया व्यक्तींना वापरता येतो. जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रात आॅपलाईन व आॅनलाईन नोंदणीची व्यवस्था करण्यात आली. सुरूवातील को-विन अ‍ॅप नोंदणी करणाºयांची संख्या अत्यल्प होती. मात्र, १ मार्चपासून वाढल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिली.

ठळक मुद्देकेंद्र सरकारच्या घोषणेचा परिणाम : ६९ केंद्रांमधून लसीकरण सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बहुप्रतिक्षित ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा डोस सोमवारी ३५ जणांनी घेतला. यामध्ये ११ आरोग्य कर्मचारी व २४ ज्येष्ठ नागरिक व सहव्याधी व्यक्तींचा समावेश आहे. ही लस देण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकच केंद्र सुरू झाले. १ एप्रिल २०२१ पासून ४५ वर्षांच्या पुढील सर्व नागरिकांना लस मिळणार, अशी घोषणा केंद्रीय मंत्र्यांनी आज घोषणा केली. याबाबतच आदेश मिळाला नाही. मात्र, पूर्वतयारी म्हणून केंद्रांची संख्या वाढविण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाने सुरू केल्या आहेत.जिल्ह्यात सध्या ६९ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. आरोग्यसेवक, कोरोना योद्धा,४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त व ६० वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण आता अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यातील सर्व केंद्रांना कोविशिल्डचे ४० हजार डोस वितरीत करण्यात आले होते. 

को-विन अ‍ॅपवर वाढली नोंदणीलसीकरण मोहीमेसाठी को-विन नावाचा प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला. हा प्लॅटफॉर्म लसीकरण मोहीम राबवणारी यंत्रणा, लस देणारी आरोग्य सेवा व लस घेणाºया व्यक्तींना वापरता येतो. जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रात आॅपलाईन व आॅनलाईन नोंदणीची व्यवस्था करण्यात आली. सुरूवातील को-विन अ‍ॅप नोंदणी करणाºयांची संख्या अत्यल्प होती. मात्र, १ मार्चपासून वाढल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिली.

बुस्टर डोस कालावधीत बदल१३ मार्चला कोव्हॅक्सिनचे ४ हजार ८०० डोज जिल्ह्याला मिळाले. मंगळवारी पहिल्या दिवशी ३५ जणांनी डोस घेतला. दरम्यान, लशीच्या दोन डोसांमधील अंतर केंद्र सरकारने वाढविल्याच्या सूचना जारी केल्या. त्यामुळे पूर्वी २८ दिवसानंतर लसीचा दुसरा डोस घेणाºयांना आता ४ ते ६ आठवड्यांपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

लसीकरणासाठी लागणारे पुरावेमतदार ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, मनरेगा रोजगार कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक, पेन्शनची कागदपत्रे यापैकी कोणताही एक पुरावा लसीकरण व नोंदणीसाठी स्वीकारला जातो.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस