बेरोजगारांच्या हाताला काम द्यावे
राजुरा : येथे बेरोजगारांची संख्या अधिक असून त्यांच्या हाताला काम द्यावे, अशी मागणी केली जात आहे. कोळसा खाणीमध्ये काही कामगार कामाला जातात. मात्र त्यांच्या पाल्यांना काम नसल्याने नोकरीच्या शोधात इतरत्र भटकत आहेत. शासनाने विविध योजना राबवून काम द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त
वरोरा : दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यातच अनेकजण आपले वाहन रस्त्याच्या कडेला लावत असल्याने शहरातील काही भागांमध्ये वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
धान उत्पादकांच्या समस्या सोडवाव्या
नागभीड : परिसरात मोठ्या प्रमाणात धान उत्पादक शेतकरी आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यांच्यावर अनेक संकट कोसळले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना शासनाने विविध योजना राबवून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त
गडचांदूर : औद्योगिक शहर अशी ओळख असलेल्या गडचांदूरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले आहे. या संदर्भात येथील नागरिकांनी नगराध्यक्ष, तसेच मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.
माहितीच्या अधिकाराचा दुरुपयोग
चंद्रपूर : शासनाने माहिती अधिकाराद्वारे जनसामान्यांना माहिती मिळावी यासाठी ‘माहितीचा अधिकार व अधिनियम २००५’ ला सुरुवात केली. मात्र सद्य:स्थितीत अनेकजण माहितीच्या अधिकाराचा दुरुपयोग करीत आहेत. त्यामुळे अशा माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी
चंद्रपूर : बाबूपेठमधील काही रस्ते पूर्णपणे उखडले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना रहदारीस अडथळा होत आहे. या परिसरातील रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी अनेकदा करण्यात आली. मात्र प्रशासनाकडून दखल घेण्यात आली.
ग्रामीण मार्गावर अवैध वाहतुकीला ऊत
चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण मार्गावर अवैध वाहतुकीला ऊत आला. मात्र, संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अवैध प्रवासी वाहतूृकदारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे़
अडचणीत अडकल्या नळयोजना
चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांत नळयोजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या; परंतु या टाक्या शोभेच्या वास्तू ठरत आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक गावांत नळयोजनेचे पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.
पशुपालकांना चाऱ्यासाठी अनुदान द्या
चंद्रपूर : या वर्षी शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पशुपालकांना सध्या चाऱ्याची चिंता सतावत आहे. त्यामुळे या पशुपालकांना चाऱ्यासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
कोरपना तालुक्यातील रस्त्यावर खड्डे
कोरपना : वनसडी-भोयगाव-चंद्रपूर मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून वाहनधारकांना वाहन चालविणे जिकिरीचे झाले आहे. यामुळे अपघातांची संख्याही वाढत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
रस्त्यावरील बाजारामुळे नागरिकांना अडथळा
चंद्रपूर : चिमूर, सिंदेवाही, भद्रावती व जिवती तालुक्यांतील काही गावांमध्ये मुख्य मार्गालगतच भरत असल्याने बाजारांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय रस्त्यावर गर्दी असल्याने वाहनधारकांना त्रास होत.
वेगवान वाहनांमुळे अपघाताची शक्यता
चंद्रपूर : स्पर्धात्मक युगात अल्पवयीन मुले मोटारसायकलीवर स्वार होऊन सुसाट वेगाने दुचाकी चालवितात. त्यांच्याजवळ दुचाकी चालविण्याचा परवानाही नसतो. त्यामुळे अपघाताच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. याला आळा घालून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.