शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

फेऱ्यांमध्ये एकआकडी संख्या मिळविणाऱ्यांची संख्या अधिक

By admin | Updated: October 19, 2014 23:51 IST

चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात १३ उमेदवारांनी आपले नशीन अजमावले. यातील भाजपाचे उमेदवार नाना शामकुळे यांनी ३० हजारावर मताधिक्क मिळवून यश मिळविले. पहिल्या फेरीपासूनच नाना शामकुळे

चंद्र्रपूर : चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात १३ उमेदवारांनी आपले नशीन अजमावले. यातील भाजपाचे उमेदवार नाना शामकुळे यांनी ३० हजारावर मताधिक्क मिळवून यश मिळविले. पहिल्या फेरीपासूनच नाना शामकुळे यांचे मताधिक्क इतरांपेक्षा वाढत होते. केवळ १६ व्या फेरीमध्ये शिवसेनेचे किशोर जोरगेवार यांनी लिड घेतली. काही फेऱ्यांमध्ये बहुतांश उमेदवारांची दोनअंकी संख्याही पार करता आली नाही.रविवारी सकाळी मतमोजनी सुरु झाली. पहिल्या फेरीमध्ये नाना शामकुळे यांना ३ हजार ७४ मत मिळाले. तर जोरगेवार यांना १४२८, नागापूरे ४१८, मेंढे यांना १३७९ मत मिळाली. पहिल्या फेरीपासून तर १६ व्या फेरीपर्यंत शामकुळे यांचे इतरांच्या तुलनेत मताधिक्य वाढत होते. १६ व्या फेरीमध्ये किशोर जोरगेवार यांनी ४ हजार ६२२ तर शामकुळे यांना ३ हजार १४२ मत मिळाले. अशोक नागापूरे यांना ३२२, काँग्रेसचे मेंढेना १२०२ मते मिळाली.या निवडणुकीमध्ये भाजपाचे नाना शामकुळे यांना ८१ हजार ४८३ मते मिळाली. तर शिवसेनेचे किशोर जोरगेवार यांना ५० हजार ७११, कांँग्रेसचे मेंढे यांना २५१४०, राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक नागापुरे ७ हजार ४५९, भारिप बहुजन महासंघाचे अनिरुद्ध वनकर यांना १४ हजार ६८३ मतांवर समाधान मानावा लागले.तर बहुजन मुक्ती पार्टीचे प्र्रकाश शंकर रामटेके यांना ५५२, अपक्ष उमेदवार मिलिंद दहिवडे यांना ७१८, आंबेडकरराईट पार्टी आॅफ इंडियाचे रविंद्रनाथ पाटील ४१३, अपक्ष चिन्नाजी नलबोगा १६९८, अपक्ष प्रफुल्ल खोब्रागडे ४३०, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुनिता गायकवाड यांना १ हजार २८८, बहुजन समाज पार्टीचे अंकलेश खैरे ८ हजार ३५७ तर रिपब्लिक पार्टी आॅफ इंडिया ए. चे प्रमोद सोरते यांना २२७ मते मिळाली.विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये १३ उमेदवारांपैकी तब्बल पाच उमेदवारांना तीन आकडी संख्याही पार करता आली नाही. तर चार आकडी मतदानाची संख्या चार उमेदवारांनी घेतली आहे. राष्ट्रवादीचे चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात त्यांना केवळ ७ हजार ४५९ मतांवर समाधान मानावे लागले. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला चंद्रपूर विधानसभा क्षेत्रामध्ये केवळ १ हजार २८८ मते मिळाले.