शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सीमेवरील गावांत दारू दुकानांची संख्या वाढली

By admin | Updated: July 18, 2014 00:00 IST

तालुक्यातील वैनगंगा तिरावर वसलेल्या तारसा (खुर्द व बुज) या ग्रामपंचायत हद्दीतील अल्प लोकसंख्या असलेल्या गावात दिवसेंदिवस दाुरु दुकानांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शेजारील दारूबंदी

गोंडपिपरी : तालुक्यातील वैनगंगा तिरावर वसलेल्या तारसा (खुर्द व बुज) या ग्रामपंचायत हद्दीतील अल्प लोकसंख्या असलेल्या गावात दिवसेंदिवस दाुरु दुकानांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शेजारील दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारू तस्करी होण्याची शक्यता आहे. शासनाने तारसा गावाच्या लोकसंख्येचा विचार न करता मोठ्या अर्थकारणातून धनाढ्यांना परवाने वितरीत केले असून त्यामुळे परिसरातील महिला व नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.तालुका सिमेवरुन वाहणारी वैनगंगा नदीही चंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही जिल्ह्याच्या सिमेवरुन वाहते. चंद्रपूर जिल्हा सिमेवर वसलेल्या तारसा (खुर्द) या गावाची अंदाजे लोकसंख्या तेराशेच्या घरात आहे. मात्र वैनगंगा तिरावरील तारसा गावाला गेल्या काही वर्षांपूर्वी मद्यसम्राटांनी दारू व्यवसायाचे केंद्र बनवित चार बिअर बार व एक देशी दारू दुकान उघडले आहे. तारसा या गावातील लोकांची आर्थिक परिस्थिती व व्यसनाधिनतेचे प्रमाण अल्प असतानाही दिवसेंदिवस या गावात दारू दुकानांच्या संख्येतील वृद्धीमुळे आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. तारसा या गावात शासनाकडून मद्य प्रतिष्ठानांना देण्यात आलेल्या परवान्यांमुळे शेजारील दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारू तस्करी करणाऱ्याचे प्रमाणही वाढले आहे. अनेकदा पोलिसांनी वाहन तपासणी दरम्यान दारू पकडून कारवाई केली आहे. परिसरातील नागरिकांच्या मते मुबलक पाणी साठ्याचे पात्र असलेल्या वैनगंगा नदी तिरावर शासनाने बेरोजगारांसाठी मोठा प्रकल्प उभारुन रोजगाराची संधी उपलब्ध करावी, अशी अपेक्षा असताना शासन मात्र जिल्हा सिमेवरील अविकसित व अल्प लोकसंख्या असलेल्या गावात क्षमतेपेक्षा अधिक दारू दुकानांचे परवाने वितरीत करुन सामाजिक आरोग्याला धोका निर्माण करीत असल्याचा आरोप होत आहे. परवाना वाटपाच्या मोठ्या अर्थकारणातून धनदाडग्यांना व्यवसायासाठी रान मोकळे करुन देत असल्याचा आरोपही परिसरातील नागरिकांकडून होत आहे.गेल्या चार ते पाच वर्षांत येथून दारू तस्करीच्या वाढत्या प्रमाणामुळे पोलिसांनाही तारेवरची कसरत करावी लागत असून पोलिसांना गुंगारा देण्यात पटाईत ठरलेल्या काही दारु तस्करांनी लाखोंची माया जमवून ‘सेटींग’ प्रणालीतून दारू तस्करीचा व्यवसायही विस्तारला आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन मद्यांच्या दुकानांना परवानगी देऊ नये, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)