शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आता मंचावरून ज्ञानार्जनाचे कार्य सुरू - सुधीर मुनगंटीवार

By admin | Updated: March 1, 2016 00:42 IST

कर्मयोगी बाबा आमटे व पु.ल. देशपांडे यांनी झाडाचे फुले तोडू नका असा संदेश देशपातळीवर पोहचविला. हा संदेश तेवत राहो, ...

वरोरा : कर्मयोगी बाबा आमटे व पु.ल. देशपांडे यांनी झाडाचे फुले तोडू नका असा संदेश देशपातळीवर पोहचविला. हा संदेश तेवत राहो, याकरिता मंचावरील पाहुण्यांना पुष्पगुच्छा ऐवजी पुस्तक भेट देण्यात येत आहे. पाहुणे मंचावर पुस्तकाचे वाचन करीत असल्याने आता मंचावर ज्ञानार्जनाचे कार्य युती शासनाच्या काळात सुरू झाले आहे, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा येथे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्य आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्याच्या समारोप प्रसंगी शनिवारी केले.दोन दिवसीय माजी विद्यार्थी मेळाव्याचा समारोप महारोगी सेवा समिती आनंदवनचे सचिव डॉ. विकास आमटे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. यावेळी मंचावर ना. सुधीर मुनगंटीवार, सिजेंटा फाऊन्डेशनचे पार्षदास गुप्ता, नामदेव डाहुले, आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पोतदार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुणे मंचावर दोन ते तीन तास बसत असतात. त्यांना पुष्पगुच्छ दिल्यानंतर त्यातील फुलांच्या पाकळ्या मोडत असतात. फुले ही झाडालाच चांगली दिसतात. त्याचा दुरूपयोग होत असल्याने आता पाहुण्यांना पुष्पगुच्छा ऐवजी पुस्तके भेट देवून सत्कार करीत आहे. कार्यक्रम सुरू असताना प्रमुख पाहुणे पुस्तके वाचून ज्ञानात भर पाडीत असल्याने आनंद होतो, असे सांगून ना. सुधीर मुनगंटीवार यांनी कृषी महाविद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देण्यासाठी उद्योग उभारा व शेतकऱ्यांना शेतात जावून मदत करा, असे आवाहन केले. याप्रसंगी ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आढावा पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ज्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळत नाहीस त्या कुष्ठरोग्यांनी महाविद्यालयाची इमारत बांधुन हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे उघडी करून दिली. त्यामुळे हे जगातील एकमेव महाविद्यालय असल्याची ग्वाही डॉ. विकास आमटे यांनी दिली. याप्रसंगी माजी विद्यार्थी मारोतराव वरभे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पोतदार यांनी केले. संचालन प्रा. राहुल तायडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. मनोज जोगी यांनी मानले. हर्षदा पोतदार यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला सुधाकर कडू, कौस्तुभ आमटे, गौतम करजगी, डॉ. विजय पोळ, निवृत्त प्राचार्य एम.वाय. पारालपवार, महारोगी सेवा समितीचे विश्वस्त, सेवानिवृत्त प्राध्यापक, प्राध्यापक, माजी विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)