शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरकरांच्या शिरावर आता हेल्मेटचा भार

By admin | Updated: January 18, 2016 00:42 IST

सध्या पोलिसांचा वाहतूक सुरक्षा सप्ताह सुरू आहे. या पार्श्वभूमीवर दुचाकीधारकांना हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे.

कारवाईसाठी पोलीस सज्ज : वाहनधारकांची उडणार तारांबळचंद्रपूर : सध्या पोलिसांचा वाहतूक सुरक्षा सप्ताह सुरू आहे. या पार्श्वभूमीवर दुचाकीधारकांना हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी अगदी काही दिवसांतच केली जाणार आहे. दुचाकी अपघातामध्ये साधारणत: डोक्याला ईजा होण्याची शक्यता अधिक असते. त्यातून प्रसंगी जीवही गमवावा लागतो. त्यामुळे वाहतूक नियमानुसार पूर्वीपासूनच दुचाकीधारकांना हेल्मेट वापरणे सक्तीचे आहे. असे असले तरी वाहतूक विभागही या विषयात आतापर्यंत गंभीर नव्हता. मात्र आता प्रत्येक दुचाकीधारकाला हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्याचा निर्णय वाहतूक पोलीस विभागाने घेतला आहे. लवकरच या विषयात कारवाईची मोहिम हाती घेण्यात येणार आहे. परंतु वाहतूक पोलीस विभागाच्या या सक्तीला चंद्रपुरातील वाहनधारक किती जुमानतील, यावरच या मोहिमचे यश अवलंबून आहे. चंद्रपूर शहरात दुचाकी वाहनांची संख्या हजारोच्या घरात आहे. बोटावर मोडण्याईतके दुचाकीधारक हेल्मेटचा वापर करतात. अन्य दुचाकीधारकांना हेल्मेट सक्तीचे वाटत नाही. त्यामुळे आजवर दुचाकीधारक हेल्मेटचा वापरच करीत नव्हते. परंतु आता वाहतूक पोलिसांकडून थेट कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याने प्रत्येकच दुचाकीधारकाला वाहन चालविताना हेल्मेट वापरावे लागणार आहे. साधारणत: हेल्मेटची किंमत ५०० रुपयांच्या पुढे आहे. चांगल्या कंपनीचे हेल्मेट दिड हजारांपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. आता हेल्मेट सक्तीचे करण्यात येणार असल्याने नागरिकांना अधिकचा आर्थिक भूर्दंड यानिमित्ताने सहन करावा लागणार आहे. हेल्मेट खरेदीसाठी चांगलीच धावपळ करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)हेल्मेट उपलब्ध होतील काय?येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकी वाहनधारकांविरुद्ध कारवाईची मोहिम आरंभली जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी दुचाकीधारकांना हेल्मेट खरेदीच करावे लागणार आहे. चंद्रपूर शहरातील वाहनांची संख्या लक्षात घेता, एकाचवेळी विक्रेत्यांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात हेल्मेट उपलब्ध होतील काय, हा खरा प्रश्न आहे. दुचाकी अपघातामध्ये दुचाकीवरील प्रवाशाच्या डोक्याला गंभीर ईजा होते. त्यातून अनेकदा मृत्युही ओढवतो. त्यामुळे नागरिकांच्याच सुरक्षेसाठी आम्ही प्रत्येक दुचाकीधारकांना हेल्मेट वापरणे सक्तीचे करणार आहोत. त्यामुळे दुचाकीधारकांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी हेल्मेटचा वापर करावा. मोहिमेदरम्यान, जर कुणी दुचाकीधारक हेल्मेटशिवाय वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल.- अशोक कोळी, पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग चंद्रपूर.