पालकमंत्र्यांनी मानले चंद्रपूरकरांचे आभार : नव्या आव्हानाला सिद्ध व्हाचंद्रपूर : सन २०१६ मध्ये एक कोटीचा संकल्प केला होता. एक कोटी ८२ लाख वृक्षाची लागवड करण्तात आली. यावर्षी चार कोटीचा संकल्प केला. पाच कोटी २१ लाखांची वृक्ष लागवड झाली. आता पुढील वर्षी १३ कोटी वृक्ष लावगडीसाठी सिध्द व्हा, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. चंद्रपूर जिल्हा चार कोटी वृक्ष लागवडीत केवळ ६७ हजार वृक्ष लागवडीच्या फरकाने दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी जिल्हावासीयांचे आभार मानले आहे.सोमवारी वनमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, वनाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपरिषदा- नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या अधिकाऱ्याशीही संपर्क साधला. ४३ लाखांच्या वृक्षलागवडीबद्दल त्यांचे कौतुक केले. नाशिक जिल्ह्याने या वृक्ष लागवडीत ४४ लाख २ हजार ७०२ वृक्ष लावले आहे.राज्यात ७ जुलै रोजी सायंकाळपर्यंत ५ कोटी ४३ लाख ३५ हजार ४९ वृक्षांची लागवड करण्यात आली असून या संकल्पपूर्तीमध्ये अधिकारी-कर्मचारी, वनसंरक्षक आणि वनमजुरापासून राज्यातील सर्व जनता, स्वयंसेवी-सामाजिक संघटना, आध्यात्मिक संस्था आणि इतर मान्यवर पूर्ण उजेर्ने सहभागी झाले होते. या सर्वांचा मी आभारी आहे. आता प्रत्येक जिल्ह्याने यावर्षी लावलेल्या वृक्षाच्या संगोपनाबरोबर पुढील वर्षीच्या १३ कोटी वृक्ष लागवडीसाठी जिल्ह्यातील लॅण्ड बँकेची तयारी, उत्तम व दर्जेदार रोपांसाठी अत्याधुनिक रोपवाटिकांची निर्मिती आणि एक कोटी हरित सेनेसाठी स्वयंसेवकांची नोंदणी या चतु:सुत्रीवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले की, प्रत्येक अधिकाऱ्याने आठवड्यातून किमान दोन तास या संकल्पाच्या नियोजन आणि कृतीसाठी राखून ठेवावा. जिल्हापातळीवर यासाठी आवश्यक असणाऱ्या समित्यांची स्थापना करावी, वृक्ष लागवडीसाठी जमीन कुठे आणि कशी उपलब्ध होऊ शकेल, याचे नियोजन करून तिथे भविष्यात किती वृक्ष लागवड करता येऊ शकेल, याचा आराखडा तयार करावा.राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात स्मृती वन, वनौषधी वन विकसित केले जावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. बांबू लागवड मिशनमोड स्वरूपात हाती घेण्यासाठी उत्तम बांबू नर्सरीत तयार करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. जल, जमीन, जंगल आणि पशुधन दृष्टीसमोर ठेवून पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवडीचे नियोजन करताना वृक्ष लागवड ही उपजीविकेशी संलग्न कशी होईल, यातून ग्रामीण अर्थव्यवस्था कशी विकसित होईल, हे ही पाहिले जावे, असे त्यांनी सांगितले. व चंद्रपुरकरांचे आभार व्यक्त केले. हरित महाराष्ट्र चळवळीला वेग- खारगेवनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली हरित महाराष्ट्राच्या चळवळीला वेग आल्याचे वनसचिव विकास खारगे यांनी यावेळी सांगितले. वृक्ष लागवडीबरोबर वृक्ष संगोपनाचा प्रत्येक जिल्ह्याने प्लॅन तयार करावा. पुढील वृक्ष लागवडीसाठी लॅन बँक निश्चित करावी, रोपवाटिकांमधून चांगली आणि दर्जेदार रोपे तयार होतील, यासाठी विशेष लक्ष द्यावे तसेच जिल्ह्यात हरित सेनेच्या नोंदणीला गती द्यावी, असेही ते यावेळी म्हणाले.स्थानिक कार्यालयाचे शेळके यांनी केले कौतुकव्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुरु होण्यापूर्वी चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनी वृक्षलागवडीमध्ये सहभागी झालेल्या सर्व यंत्रणांच्या प्रमुख अधिकाऱ्यांचे आभार मानले. सर्वांच्या सहभागाशिवास चंद्रपूर जिल्हा विक्रमी वृक्षलागवड करु शकला नसता. मात्र या प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासून सहभागी होऊन स्वत:चा सहभाग नोंदविणाऱ्या अन्य विभागाचे वनविभागाला कौतुक असून आपले नियमित काम करीत असतांना अनेकांनी झोकून देऊन काम केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
आता एकच लक्ष्य, १३ कोटी वृक्ष
By admin | Updated: July 11, 2017 00:31 IST